Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोडयातील फरार असणारा आरोपी अटक ; तोफखाना पोलीसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-  गेली चार वर्षापासून दरोड्यातील फरार आरोपी याला पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. गोरख अशोक माळी ( वय 25, रा.माळी चिंचोरा ता. नेवासा जि. अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नाव आहे.
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शखाली तोफखाना पोलीस ठाणे पो.नि  जे.सी. गडकरी यांच्या सूचनेनुसार  तोफखाना पथकामधील पोहेकॉ शकिल सय्यद, पोना अविनाश वाकचौरे, पोना वसीम पठाण, पोना शैलेश गोमसाळे, पोकॉ धिरज खंडागळे, पोकॉ  सतिष त्रिभुवन, पोकों सचिन जगताप, पोकॉ  अनिकेत आंधळे, पोकाॅ चेतन मोहिते आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.७ सप्टेंबरला रात्रीचे १० वा. ते दि.८ सप्टेंबरच्या सकाळी  ८  वा. तोफखाना पोलीस ठाणे  हद्दीत  रात्रगस्त दरम्यान पेट्रोलींग करीत असताना तपोवन रोड, दोस्ती हॉटेल जवळ, अहमदनगर येथे एक इसम तोंडाला रुमाल बांधून त्याचे अस्तित्व लपवून पोलीसांना पाहून काटवनात पळून गेला. तोफखाना पोलीसांना संशय आल्याने त्यांनी त्या इसमाचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता, त्याने नाव गोरख अशोक माळी वय 25 वर्षे रा.माळी चिंचोरा ता. नेवासा जि. अहमदनगर असे सांगितले. तोफखाना पोलिसांनी त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली.
मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे तोफखाना पो.स्टे.ला. गुन्हा दाखल केला असुन तपासा दरम्यान नमुद आरोपीवर एम. आय.डि.सी.पो. स्टे.गु.र.नं.22/2018 भा.द.वि.क.395, 143, 147, 148, 149, 326,427 प्रमाणे दाखल गुन्हयात तसेच सोनई पो.स्टे. गु.र.नं. 148/2020 भा.द.वि.क. 3942) गु.र.नं. 18/2018 भा.द.वि.क.392, 341, 34 वैगेरे प्रमाणे दाखल गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. या कारवाईमुळे चार वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस जेलबंद करण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे.

Post a Comment

0 Comments