Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डोळयात मिरची टाकून वाईन्स दुकानातील साडेदहा लाखाची चोरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- येथील प्रकाश वाईन्सचे व्यवस्थापक यांच्या डोळयात मिरची पावडर टाकून दुकानातील  १० लाख ७० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना रविवार (दि.१२) रात्री घडली.


याबाबत समजलेले माहिती अशी की, रविवार (दि.१२) राञी १० ते १०.१५ वाजण्याच्या सुमारास काळया रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या  दोन अज्ञात चोरटे  प्रकाश वाइन्स दुकानात आले. त्या चोरट्यांनी चेह-यावर व डोळयात मिरची पावडर टाकून दुकानातील काळया १० लाख ७० रुपये रक्कम  असणारी काळ्या रंगाची हेण्ड बॅग चोरट्यांनी बळजबरीने चोरुन नेली, या प्रकाश वाईन्स दुकानाचे   व्यवस्थापक आशोर शोर शेख (रा.अशोक गंगाराम बाले पंचवटीनगर भिस्तबाग, सावेडी अहमदनगर मूळ रा. नान्नज ता. जामखेड जि.अहमदनगर ) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास तोफखान्याच्या प्रभारी पोनि ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पिंगळे या करीत आहेत.

Post a Comment

0 Comments