Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुचाकी चोरटा जेरबंद ; नगर तालुका पोलिसांची कामगिरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- दुचाकी चोरणारा चोरटा मुद्देमालासह पकडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. अंबादास भास्कर भाबड असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार मपोकाॅ  अमिना शेख, पोना सय्यद आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप याना मिळालेल्या  गोपनीय व तांत्रिक माहितीवरून नगर तालुका पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी व दि 11 ऑगस्ट  रोजी दुचाकी  चोरी करणाऱ्या आरोपी
अंबादास भास्कर भाबड (मूळ रा. पाथर्डी . सध्या रा निंबलक, एमआयडीसी नगर) याला अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चोरट्याकडून चोरीची दुचाकी व 25 हजार किमतीचा मुद्देमाल व घरफोडीची साधने हस्तगत केली. अंबादास भास्कर भाबड (मूळ रा. पाथर्डी, सध्या रा. निंबलक, एमआयडीसी नगर) आरोपीवर यापूर्वी )नगर तालुका पो ठाणे गुन्हा र न 453/21 भादवी कलम 379 व  गुरन 240 /2021 भादवी कलम 457,380 असे दोन गुन्हे उघडकीस आली आहेत. 

Post a Comment

0 Comments