Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या ; बालमटाकळी येथील घटना

 

👉दोषी पोलीसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह शेवगाव पोलीसांच्या दारात
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव -  तालुक्यातील बालमटाकळी येथील अदित्य अरुण भोंगळे (वय १७ ) याने शेवगाव पोलीसांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
   याबाबतची माहिती अशी की, बालमटाकळी येथील मयत अदित्य अरुण भोगळे याला शेवगाव पोलीस ठाणाच्या चार पोलीसांनी दोन दिवसापूर्वी दुचाकी चोरीच्या व गावठी कट्याच्या खरेदी-विक्री प्रकरणी संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते. यानंतर काल त्याला पोलिसांनी  सोडून दिले मंगळवारी रात्री साधारण ११ ते ११.३० च्या सुमारास त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आज सकाळी पोलीसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणला पण मयत अदित्यची आई श्रीमती संगीता अरुण भोंगळे हीने सांगितले की, माझ्या मुलाला पैश्यासाठी पोलीस त्रास देत होते. त्यांनी ५० हजार रुपयाची मागणी केली. मी बचतगटाचे पैसे काढून ४७ हजार रुपये पोलीसांना दिले. आणि राहिलेले ३ हजार रुपये पोलीसांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन पेव्दारे पाठवले हे सर्व ऐकल्यावर शेवगावचे दलित नेते यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात जमा झाले.


आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या त्या चार पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दुपारी ३ वाजेपर्यंत पोलीसांकडून काहीच हालचाल न झाल्याने आणि संपूर्ण तालुक्यातून आणि शेवगाव शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने जमा झाले.  दुपारी ४ वाजता शेवगाव पोलीस ठाण्यात मयत अदित्य भोंगळे याचा मृतदेह आणला.  दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल न झाल्यास त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. दोषी पोलीसांवर गुन्हे दाखल करा, भष्टाचारी पोलिसांचा धिक्कार असो अशा घोषणांनी पोलीस ठाणे परिसर दणाणून गेला.असंख्य नातेवाईक होऊन वातावरण अत्यंत संतप्त झाले होते. नंतर पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे घटनास्थळी आले. मयत अदित्यच्या आईचा इन कॅमेरा जबाव घेवून दोषी पोलीसांवर ठोस कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्यावर मृतदेह घेऊन रुग्णवाहीका अंत्यविधीसाठी बालमटाकळीकडे रवाना झाली.
   यावेळ ज्येष्ठ  नेते पवन कुमार साळवे, शिवसेना तालुका अध्यक्ष आणी पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. आविनाश मगरे, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, माजी सभापती प्रकाश भोसले ,आरपीआयचे तालुका अध्यक्ष विजय बोरुडे, बाजार समितीचे माजी सभापती अनिल इंगळे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊराव भोंगळे, केदारेश्वरचे माजी संचालक अनिल कांबळे, वंचितचे तालूका अध्यक्ष प्यारेलाल शेख, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, शेवगावचे माजी सरपंच राहुल मगरे, नगरसेवक प्रविण भारस्कर, अनिल बोरुडे , संतोष बानायत , भगवान मिसाळ,कडू मगर,राजू मगर, अरुण भोगळे, रोहीदास भोंगळे, संतोष पटवेकर आदीसह पदाधिकाऱ्यांनी शेवगाव  पोलीस ठाण्यात आंदोलनात सहभाग घेऊन संबंधित दोषी पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घटनेमुळे शेवगाव पोलिसांचा भ्रष्टकारभाराची पोलखोल झाली आहे. या घटनेमुळे वातावरण अत्यंत तप्त झाले आहे शेवगाव पोलिसांच्या कारभाराबाबत जनतेत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
--------------
--------------
👉शेवगाव च्या त्या चार पोलीसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
👉 पोलीस निरिक्षक प्रभाकर पाटील यांच्या कार्य पद्धतीवर पश्न चिन्ह त्यांच्या समोरच हाप्ते खोर म्हणून घोषणाबाजी करण्यात आली
👉 पोलीसांनी हे प्रकरण दडपल्यास पोलीसां विरोधात तीव्र जन आंदोलन करणार - विजय बोरुडे ( तालुका अध्यक्ष आर पी आय )

Post a Comment

0 Comments