Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिरापुर येथील अपंग शेतक-यास माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी केली तात्काळ मदत

 

👉माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर-   पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, शिरापुर, करडवाडी, घाटसिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, चिचोंडी शिराळ या गावातील अतिवृष्टीमुळे शेतीची पिकांची खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले. ओढे नालेच्या पुरामध्ये वाहून गेलेले शेततळे, विहिरी तसेच शेतक-यांचे दैनंदिन उदरनिर्वाहचे जनावरे, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या.
या पूर परिस्थितीची पाहणी माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी केली. यावेळी त्यांच्याबरोबर  जि.प.सदस्य पुरुषोत्तम आठरे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, पंचायत समितीचे सदस्य एकनाथ आटकर, मार्केट कमिटीचे संचालक बाबापाटील खर्से, पं.स. सदस्य एकनाथ आटकर, धिरजशेठ  मैड, रवि भापसे, बाळासाहेब लवांडे, भाऊसाहेब लोखंडे, मनोज ससाणे, अरुण रायकर, अनिल पालवे, दादासाहेब चोथे,  महेंद्र शिरसाठ, अर्जुन बुधवंत, बापू कुटे, संतोष टापरे, गोरख कारखिल, अमोल वाघ, शिवाजी कारखिल, अंबादास कारखीले, कृषी सहाय्यक राठोड आदी उपस्थित होते.
👉 यावेळी शिरापुर येथील अपंग शेतकरी यांच्या पत्नीने सांगितले की, पुरामध्ये त्यांच्या 100 कोंबड्या व शेळ्या वाहून गेलेल्याची व्यथा श्री कर्डीले यांचेकडे मांडली. श्री कर्डीले यांनी तात्काळ लगेच वैयक्तिक 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. कोंबड्या व शेळ्या त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता. त्यामुळे त्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले होते, परंतु श्री कर्डीले यांनी मदत केल्यानंतर त्या महिलेचे आंनद अश्रू अनावर झाले.

Post a Comment

0 Comments