Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोटीची फसवणूक करुन फरार असणारा आरोपी पारनेरमध्ये जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-
जळगांव जिल्ह्यातील जय श्री. दादाजी फाऊंडेशन या  संस्थेची १ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक करुन फरार असणारा आरोपीस देंठणे गुंजाळ (ता. पारनेर ) येथे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मायभूमी ग्रामविकास संस्था सचिव अविनाश अर्जुन कळमकर असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
जळगांव आर्थिक गुन्हे शाखेचे  पोउनि संदीप पाटील हे आर्थिक  गुन्हा तपासकामी अहमदनगर जिल्हयात आले होते. यावेळी  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ मयुर गायकवाड, प्रकाश वाघ, विजय धनेधर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, आरोपी  अविनाश अर्जुन कळमकर (सचिव मायभूमी ग्रामविकास संस्था, रा. देठणे गुंजाळ, ता. पारनेर) याने १८० कंपनीच्या केंद्र चालकांना सीएसआर फंडमधून अनुदान मिळाविण्याचे अमिष दाखवून बनावट नोंदणी पत्र देवून तसेच निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून १ कोटी २५ लाख रु.ची फसवणूक केल्ये बाबत सौ. योगिता उमेश मालवी, (रा. जिल्हा जळगांव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
रामानंद नगर पोलीस ठाण्यात  गु.र.नं. २५८/२०२१ भादविक ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) ३४ प्रमाणे गुन्हा जिल्हा जळगांव येथे दाखल करण्यात आला होता.
या दाखल  गुन्ह्यातील आरोपी अविनाश अर्जुन कळमकर ( रा. दैठणे गुंजाळ) हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. जळगाव आर्थिक गुन्हे शाखा जिल्हा जळगांवचे पोउनि संदीप पाटील हे  गुन्हयाचे तपासकामी अहमदनगर जिल्हयात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचेपो नि अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना पोनि कटके यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली.  आरोपी अविनाश अर्जुन कळमकर (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर) हा त्याचे राहते घरी असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला  देंठणे गुंजाळ ( ता. पारनेर) त्याचे राहते घरातुन ताब्यात घेऊन  आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा जळगांव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आले.

Post a Comment

0 Comments