Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तोफखाना हद्दीत धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील मंगळसूञ व पुरुषाची चैन चोरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- शहरातील भिस्तबाग येथे  दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी घरासमोरून एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र तर सावेडी परिसरात राहत्या घराजवळून एका पुरुषांचे गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन जोराने हिसका देऊन गळ्यातून  तोडून चोरट्यांनी धूमस्टाईलने चोरुन नेल्याच्या दोन घटना तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी घडल्या.  दोन्ही घटनेत चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून, दोन्हीही घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. १२ सप्टेंबरला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घराच कंपाउंडचे गेट उगडत असताना एक अनोळखी इसम हेल्मेट घातलेला काळ्या रंगाच्या मोपेड गाडीवर स्वार असलेला, काळे जकिंग घातलेला व शरीराने जाड असलेला अंदाजे २५ ते ३० वर्ष वयोगटातील इसमाने गोकुळनगर येथील  घराजवळ उभी असताना  गळ्यातील ५० हजार  रु. कि.चे दोन तोळे वजनाचा, सोन्याच्या चैनीचा तुकडा चार तोळे वजनाच्या सोन्याचे मंगळसूत्रामधील तुटलेला  हा जबरीने ओढून गळ्याला दुखापत करुन चोरुन घेऊन गेला.  तर  स्वप्नील रामचंद्र पवार (वय ३०,  स्वॉफ्टवेअर अभियंता, रा. प्लॉट क्रमांक ४८ श्रीकृष्ण रोड, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर) हे श्रीकृष्ण नगर येथील त्यांचे घरासमोर चालत असताना सदर अज्ञात आरोपी  याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन किंमत अंदाजे ७० हजार  रु. किमतीची ही जबरीने चोरुन ओढून पळून गेला आहे. असा एकूण १ लाख २० हजार  कि.चा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला, या लक्ष्मी नरसय्या गाडी (गजराज फॅक्टरी चिन्मय कॉलनी भिस्तबाग अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात ३९४,३९२ या कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास तोफखान्याच्या प्रभारी पोनि ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली  पोउनि. एस.पी.सोळंके हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments