Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घनशी नदीला पुर आल्याने मलकापूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला


👉शेतीपिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; तात्काळ पंचनामे करावे - भाजपाचे नेते राजेश गित्ते
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
परळी वैजनाथ :- पहाटे पासून सुरू असलेल्या पावसाने  शहरापासून जवळच असलेल्या घनशी नदीला पुर आल्याने तालुक्यातील मलकापूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दिवसभर वाहतूक देखील ठप्प होती. तसेच या भागातील शेतीच्या पीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबधित विभागाने पुलांची उंचीवाढविण्याचा प्रस्ताव तात्काळ दाखल कराला व  पावसामुळे झालेल्या शेतीपिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई भरपाई द्यावी भाजपाचे नेते राजेश गिते यांनी केले आहे.
तालुक्यातील पहाटे पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने पुर आला आहेत. शेती पिकांचे मोठ्या परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ठिकठिकाणी शेतीत पाणी घुसले आहे.  मलकापूरसह मरळवाडी, मांडवा व धर्मापुरीकडे जाणारा हा रस्ता पुर्णांता पाण्याखाली आला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली नागरिक हैराण झाले आहेत.  मंगळवार दि.7 सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस झाल्याने चांदापूर येथील धरण आँव्हरफलो झाल्याने घनशी नदी दुथडी भरून वाहत आहे. या पुलांची उंची कमी असल्यामुळे यापुलाच्या वरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शहरातील येणाऱ्या व जाणाऱ्याचा संपर्क तुटला आहे. मलकापूरसह अनेक गावातील शेतकरी दुध घेऊन शहरात येत असतात त्यांना पण जाता आले नाही. त्यामुळे आज दिवसभर गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच या रस्त्यावरील इतर पुलांवरूनही पाणी वाहत असल्यामुळे पर्याय मार्गावरही पुर आल्याने हा रस्ता बंद होता. दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. घनशी नदीला पूर आल्याने मलकापूरसह अनेक गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास झाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर व पाणी औसल्यानंतर गावाचा संपर्क दळणवळण सेवा सुरळीत होयला वेळ लागणार आहे. घनशी नदीवरील पुलासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा माजी मंत्री  पंकजाताई मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे काम रखडले ते आजतागायत झाले नाही. तरी संबंधित प्रशासनाने पुलांची उंची वाढवावी व झालेल्या शेती पिंकाच्या नुकसानांचे पंचनामे करावेत अशी मागणी जिल्हा परिषद दादाहारी वडगाव गटाचे भाजपाचे नेते राजेश गित्ते यांनी केली आहे.
संकलन : महादेव गिते

Post a Comment

0 Comments