Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साडेपंधरा लाख रुपयांचा गुटखा, तंबाखू व वाहनासह पाच आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-  महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा, तंबाखू व वाहनासह १५ लाख ६२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन  पाच आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
शेख नासिर अहमद चाँदमिया (वय ४४, रा. गाडेकर गल्ली, भिंगार, टेम्पो नं. एमएच १६ सीसी ४९२० वरील चालक),  शेख अय्याज नसीर ( वय ३९, रा. मोमीनगल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख, (वय ३४ , रा. नागरदेवळा, ता. नगर, टेम्पो नं. एमएच-१६ सीसी ३६२१ वरील चालक), सय्यद असीफ महेमूद ( वय ४२, रा. मोमीनगल्ली, भिंगार)  असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गणेश इंगळे, सपोनि सोमनाथ दिवटे, सफौ मन्सूर सय्यद, पोहेकॉ  संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, पोना शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ राहुल सोळंके, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली. अशोक लेलँड टेम्पो (एमएच १६ सीसी ४९२०) व टेम्पो  (एमएच-१६ सीसी ३६२१) या दोन टेम्पोमधून काही इसम हे दौंड ते अहमदनगर रोडने महाराष्ट्र  राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा विक्री करण्यासाठी घेऊन अहमदनगर शहराचे दिशेने येत आहेत. आत लागलीच नगर-दौड रस्त्यावरील अरणगावचौक या ठिकाणी जावून सापळा लावल्यास मिळून येतील, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. याबाबत श्री कटके यांनी  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले. त्यांनतर पथकाने मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने अरणगाव चौक या ठिकाणी जावून सापळा लावला.
त्यानंतर काही वेळातच माहितीप्रमाणे दोन लहान टेम्पो दौंड बाजूकडून अहमदनगर शहराचे दिशेने येत असल्याचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी एकाच वेळी रस्त्यावर येवून दोन्ही टेम्पो चालकांना त्यांचे टेम्पो थांबविण्याचा इशारा केला. टेम्पो चालकांनी रस्त्याचे कडे टेम्पो थांबविताच दोन्ही टेम्पोचे चालक व त्यांचे समवेत असलेले दोन इसम यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते सांगितले.
त्याच्या ताब्यात असलेल्या दोन्ही टेम्पोंची पंचासमक्ष झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला हिरा कंपनीचा गुटखा तसेच रॉयल ७१७ कंपनीची तंबाखू व दोन टेम्पो असा एकूण १५ लाख ६२ हजार ३०० रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी टेम्पो (एमएच १६ सीसी ४९२०) मधील माल व टेम्पो हा शेख नूर अब्दुल रऊफ, (रा. मोमीन गल्ली, भिंगार) याचे मालकीच असल्याचे सांगितले. तसेच टेम्पो ( एमएच १६ सीसी ३६२१) हा सुध्दा शेख नूर अब्दुल रऊफ ( रा. मोमीन गल्ली, भिंगार) याचे मालकीचा असून त्यामधील माल हा सादीक खान इमाम पठाण (रा. नेवासा) याचे मालकीचा असल्याचे सांगितले. त्यावरुन आरोपींचा शोध घेऊन आरोपी सादीक खान इमाम पठाण ( वय ४८ वर्षे, रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा, ता. नेवासा) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. तसेच आरोपी  शेख नृ अब्दुल रऊफ (रा. मोमीन गल्ली, भिंगार (फरार) याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
आरोपी हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखू विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द एलसीबीचे पोकॉ कमलेश हरिदास पाथरुट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  नगर तालूका पोलिस ठाण्यात गुरनं. ४९५/२०२१, भादिव कलम १८८, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नगर तालुका पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments