Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरुन नेलेली ॲपेरिक्षा सापडली, एक अटक ; कोतवाली डिबीची कामगिरी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर: कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतून चोरी गेलेली ॲपेरिक्षा सापडून चोरट्यास पकडण्यात कोतवाली गुन्हे शाखेला यश आले आहे. सुरज दिलीप नरवडे (वय २६, रा तपोवन रोड कोल्हेश्वरीनगर अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नाव आहे.
नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे  यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक  राकेश मानगांकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोना नितीन गाडगे, पोना शरद गायकवाड, पोना शाहीद शेख, पोना बंडु भागवत, पोना भारत इंगळे, पोना योगेश भिंगारदिवे, पोकॉ सुमित गवळी पोकॉ अभय कदम, पोकों दिपक रोहोकले, पोकॉ सुशिल वाघेला, पोकों सुजय हिवाळे, पोकों तान्हाजी पवार, पोको प्रमोद लहारे, पोकों सोमनाथ राऊत आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. ६ सप्टेंबर  रात्री  कष्टाची भाकरी केंद्रातील काम आटोपल्यावर त्याची पॅगो रिक्षा (एमएच १६ व्ही ९९९४) ही कष्टाची भाकरी केंद्रा समोर मार्केटयार्ड अहमदनगर येथे लॉक करुन हॉटेलमध्ये झोपायला गेले होते. त्या दरम्यान त्यांची ॲपे रिक्षा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिचे हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली, या निलेश गोरख शिंदे (वय ३५ रा भांबळ गल्ली भोसले आखाडा बुरुडगाव रोड अहमदनगर ) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात  गुरनं ६५९/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास सुरु असताना पोलीस निरीक्षक  राकेश मानगांवकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चोरीस गेलेली ॲपेरिक्षा हा बांबोरी (ता-राहुरी जि अहमदनगर) येथे आहे.  गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाबाबत आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी बांबोरी येथे जावून सदर रिक्षाबाबत शोध घेतला असता सदरची रिक्षा हि बेवारस स्थितीत मिळून आल्याने तिचा दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आली. सदर गुन्हयातील आरोपी हा पुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देश्याने आपले अस्थित्व लपवीत असतांना आयुर्वेदिक कॉर्नर अहमदनगर येथे संशयीतरित्या त्याच्या जवळील विविध गाडयांच्या चाव्याच्या जुडम्यासह मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरज दिलीप नरवडे वय २६ वर्षे रा तपोवन रोड कोल्हेश्वरी नगर अहमदनगर असे असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने ॲपेरिक्षा चोरीची कबुली दिली. या आरोपींवर तोफखाना पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

0 Comments