Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ परिसरात झालेल्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी

 

👉बेलपार तलावाच्या भितीवरील झाडाझुडपे काढण्याच्या प्रांताधिकारी यांच्या सूचना
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
चिंचपुर पांगुळ : अहमदनगर जिल्ह्यातील  पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात चार-पाच दिवस जोराच्या पावसामुळे झालेल्या चिंचपूर पांगुळ, वडगावासह वाड्यावस्त्यावरील परिसरात नुकसानीची पाहणी सोमवारी (दि.6) प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, बीडीओ शितल खिंडे यांच्यासह अन्य अधिका-यांच्या पथकाने केली.


पिपळगाव टप्पा येथील पाथर्डी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. चिंचपुर पांगुळ नदीवरील पूलाचा काही भाग झालेल्या मुसळदार पावसाने खचला आहे. या कोसळलेल्या पुलाची अधिकारी यांनी पाहणी केली, यावेळी  संबंधितांना तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.  ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे,  त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी यांना प्रांताधिकारी यांनी देण्यात आल्या.
दरम्यान,  अधिकारी यांनी वडगांव बेलपारा मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रांताधिकारी केकाण यांनी भितीवरील  मोठया प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे संबंधित उपस्थित अधिकारी यांना काढण्याच्या सूचना दिल्या. 
यावेळी प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर व गटविकास अधिकारी शितल खिंडे , तलाठी मनोज खेडकर, ग्रामसेवक तसेच युवराज पांगरे, गोरख वाघमारे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

संकलन-
पत्रकार सोमराज बडे

Post a Comment

0 Comments