Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- श्रीरामपूर, शिर्डी परिसरात घराचा दरवाजा तोडून दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात  स्थानिक गुन्हे शाखेलायश आले आहे. यासीनखाँ उर्फ अनिल शिवाजी भोसले ( रा. गोंडेगाव, ता. नेवासा),  सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव, ता. नेवासा) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,  अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शिर्डी  उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, पोकॉ प्रकाश वाघ, मयूर गायकवाड, सागर ससाणे, जालिंदर माने, रोहित येमूल, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की,  दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजीचे रात्री आई व आजीसह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी ७ ते ८ इसमांनी बंगल्याचे मेनगेट व दरवाजा कटावनीचे सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश करुन आई व आजी यांना कटावनी व चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधून घरातील सोने चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण १२ लाख २० हजार  रु. किं. चा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला. या अशिष अनिल गोंदकर ( वय २३, रा. हरिओम बंगला, सितानगर नाला रोड, शिर्डी) यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात  गुरनं. २६९/२०२१ भादवि कलम ४५७, ४५८, ३८०, ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या  दाखल गुन्ह्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी , स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी  गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षक करुन आरोपीबाबत माहिती घेतली. त्यांनतर जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांचे सुचना प्रमाणे सदर गुन्ह्याचे तपासकामी पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून सुचना दिल्या होत्या. त्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना अशा प्रकारचे गुन्हे करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना दाखविण्यात आले होते. त्यावरुन फिर्यादी व साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीचे आधारे गुन्ह्यातील आरोपींचा तपास चालू असताना पोनि कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली.  गुन्हा हा अनिल भोसले व त्याचा भाऊ गुलब्या भोसले ( दोघे रा. गोंडेगाव, ता. नेवासा) व त्याचे टोळीतील साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  आरोपीचा शोध घेत होते. परंतु आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे वारंवार आपले वास्तव्याचे ठिकाणे बदलून रहात होते. परंतु पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपीचे मागावर होते. त्या दरम्यान आरोपी अनिल भोसले व त्याचा भाऊ गुलब्या भोसले हे दोघे त्यांचे घरी आले असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गोंडेगाव येथे जावून आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते पळून जावू लागले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन दोन आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींन यासीनखाँ उर्फ अनिल शिवाजी भोसले, सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले, (दोघे  रा. गोंडेगाव, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांनी व त्यांचे इतर सहा साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यापैकी एक साथीदार हा विधीसंघर्षीत बालक असून इतर फरार आरोपींचा शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाही.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेवून आणखी कोठे-कोठे गुन्हे केलेले आहेत याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुक्यामध्ये गुन्हे केल्याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments