Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव - तालुक्यातील गदेवाडी येथे दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, म्हणून फॉरचूनर गाडीतून पळवून नेत, मारहाण केल्याने विनायक किसन मडके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून तिघांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर, मच्छिंद्र धनवडे, यांच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
 याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, गदेवाडी येथे आठ दिवसापूर्वी मयत विनायक किसन मडके (रा गदेवाडी) हे घोड्यावर शेतात जात असताना फरचुनर गाडी (क्र. २२२३) हिने कट मारून दमदाटी व शिवीगाळ केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मयतास दारू पिण्यास पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्याचा राग मनात धरून दि ९ सप्टेंबर २०२१ रात्री ९.१५ च्या सुमारास फरचूनर गाडीमध्ये मयतास विनायक किसन मडके यांना घातपातच्या उद्देशाने पळवून नेऊन लाथाबुक्यांनी मारहाण करून छळ केला. यानंतर मयत मडके याला गळफास घेण्यास प्रवृत्त केले, या  तुळशीराम विनायक मडके (रा गदेवाडी) यांच्या फिर्यादीवरून मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर, मच्छिंद्र धनवडे, यांच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी अधिक तपास सपोनि सुहास पावरा हे करीत आहेत.

संकलन : बाळासाहेब खेडकर

Post a Comment

0 Comments