Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पती,पत्नीसह मुलीची आत्महत्या

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगरनगर शहराजवळ असलेल्या केडगाव येथील एकाच कुंटाबातील तीन जणांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. केडगांव येथील विठ्ठल कॉलनी,मोहिणीनगर येथील ही घटना आहे. संदिप दिनकर फाटक वय 40, पत्नी किरण संदिप फाटक वय 32,मैथिली संदिप फाटक वय 10 असे आत्महत्या केलेल्या मयतांची नांवे आहेत. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोतवाली पोलीस घटना स्थळी दाखल असून तीनही शव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली असून शवविच्छेदन केले जात आहे.
घटनास्थळी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक माणगावकर यांनी तातडीने धाव घेत पाहणी केली. या ठिकाणी पोलिसांना सुसाईड नोट मिळाल्याचे समजत असून कर्जाला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मयतात मुलगी मैथली ही केवळ दहा वर्षांची आहे. तिनेही आत्महत्या केलीय का असा प्रश्न आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments