Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

किर्तनवाडीत बीड महामार्गालगत असणा-या घर व दुकानांनी पाणी शिरल्याने मोठे नुकसान

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
खरवंडी कासार :  नुकत्याच झालेल्या पावसामुळे किर्तनवाडी येथे बीड महामार्गालगत असणा-या घरांनी व दुकानांनी पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. बीड महामार्गावर दुतर्फावर पावसाचे पाणी जाण्यासाठी नाले खोदकाम केल्यास पावसाचे पाणी घरांनी व दुकानांनी न घुसता थेट नदीनाल्यांना मिळेल. यामुळेच प्रशासनाने किर्तनवाडीसह अन्य गावांच्या ग्रामस्थांनी बीड महामार्गावरील गाव परिसरात महामार्गाच्या दुतर्फावर पावसाचे पाणी जाण्यासाठी नाले खोदकाम करावेत, अशी मागणी केली आहे.
पाथर्डी तालुक्यातील शनिवारी राञी व रविवारी पहाटे पडलेल्या पाऊसामुळे  किर्तनवाडी येथील बीड महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फावर पावसाचे पाणी जाण्यासाठी नाले खोदकाम झाले नसल्याने पावसाचे पाणी घराने व दुकानात घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


Post a Comment

0 Comments