Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे जिल्ह्यातून केले जेरबंद ; नगर एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- २७ गुन्हे दाखल असलेला व महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रमुख सराईत गुन्हेगार सागर भांड याला पुणे जिल्ह्यात पकडण्यात  स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सागर आण्णासाहेब भांड ( वय- २५, रा. मूळ रा. ढवणवस्ती, सावेडी, अहमदनगर, ह.रा. रांजणगाव गणपती, धुमाळसर) असे पकडण्यात आलेल्याचे नावे आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटक यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पथकातील सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, पोना सुरेश माळी, शंकर चौधरी, विशाल दळवी, सचिन आडबल, दिपक शिंदे, पोका प्रकाश वाघ, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजीचे रात्रीच्या वेळी मोटार सायकलवरुन खंडाळा, श्रीरामपूर येथून तमनर आखाडा येथे नगर-मनमाड रोडने त्यांचे घरी येत असताना रात्री ७.४५ वा. चे सुमारास शनिशिंगणापूर फाटा येथे लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी सोनईत रस्त्याने काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या अनोळखी चार इसमांनी कत्तीचा धाक दाखवून  जवळील रोख रक्कम, मोबाईल, बॅग व मोटार सायकल असा एकूण २० हजार  रु. किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेच्या दिलीप देवराम तमनर ( रा. तमनर आखाडा, राहुरी, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून  राहुरी पोलिस ठाण्यात येथे गुरनं. ६५२ / २०२१ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच त्यापुर्वीही वाहन चालकांना अडवून लुटमार करण्याच्या घटना घडलेल्या असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सुचनानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास करुन  गुन्हा उघडकीस आणून नितीन मच्छिन्द्र माळी (वय २२ वर्षे, रा. मोरे चिंचोरे, ता. राहुरी), गणेश रोहीदास माळी (वय २१, रा. खडकवाडी, मूळा डॅम जवळ, ता. राहुरी), रवि पोपट लोंढे ( वय २२, रा. घोडेगाव, ता. नेवासा), निलेश संजय शिंदे (वय २१, रा. पारिजात चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर), रमेश संजय शिंदे (वय २०, रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी) व एक अल्पवयीन साथीदार यांना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन राहूरी पोलिस ठाण्यात हजर केलेले आहे.
गुन्ह्यातील  आरोपी यांचा मुख्य साथीदार टोळी प्रमुख सागर भांड हा सदरचा गुन्हा केल्यापासून नजरेआड झालेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाल स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे आरोपी सागर भांड याचा शोध घेत असताना पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. आरोपी सागर भांड हा (रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) येथे भाड्याने खोली घेवून रहात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. पथकाने रांजणगाव येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती काढून आरोपी  सागर आण्णासाहेब भांड याला ताब्यात घेतले. त्याच्या वरील गुन्ह्याबाबत तसेच आणखी कोठे कोठे गुन्हे केलेले आहेत याबाबत कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे वरील व  साथीदारांनी मिळून मागील दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये नगर-पुणे रोडवर, सुपा शिवार, नगर-मनमाड रोड व संगमनेर-लोणी रोड या ठिकाणी वाहन चालकांना अडूवन लुटमार केलेली असून आरोपी सागर आण्णासाहेब भांड व त्याचे टोळीतील वरील नमुद साथीदारांकडून खालील प्रमाणे रस्तालुटीचे एकुण ७ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

Post a Comment

0 Comments