Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

११ लाखांचा गुटखा पानमसाला, तंबाखू जप्त : वाहनासह ३ आरोपी अटक ; एलसीबीची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- १० लाख ८० हजार ९६८ रुपयांचा गुटखा पानमसाला, तंबाखू व वाहतूक करणारे मारुतो डिझायर वाहन जप्त करुन तीन आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.
आनंत विलास भालेकर (वय ३९ रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद (चालक), जमीर अब्दुल सत्तार मुला (वय ३८ रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद), अविनाश चंद्रकांत हालकरे (वय ३० रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील सपोनि गणेश इंगळे, सपोनि सोभनाथ दिवटे, सफौ मन्सूर सय्यद, पोहेकॉ दिनेश मोरे, संदीप घोडके, संदीप पवार, पोना शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, पोकों कमलेश पाथरुट आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की,  दि.६ सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके  यांना गोपनिय माहिती मिळाली   नगर शहरामध्ये काही इसम हे कोटला चौक, फलटण चांकी समोर मारुती स्विफ्ट ( एमएच-२५-एल-७७७३) या गाडी मधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा विक्री करण्यासाठी स्टेट बँक चौकाकडून घेवून येत आहेत. आता लागलीच कोटला चीक, फलटण चौकीसमोर या ठिकाणी जावून सापळा लावल्यास मिळून येतील, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. श्री कटके 
यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने दोन पंचासह खाजगी वाहनाने कोटला चौक, फलटण चौकीसमोर जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच माहिती प्रमाणे  क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डीझायर स्टेट बँक चौकाकडून येतांना दिसली.  पथकातील अधिकारी, अंमलदार यांची खात्री झाल्याने यांनी एकाच वेळी रस्त्यावर येवून कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता कार चालकानी कार रस्त्याचे कडेला थांबविताच कार चालक व त्याचे समावेत असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते सांगितले.
त्यांच्या कारची पंचासमक्ष कारची झडती घेतली. दरम्यान  कारमध्ये रु ९ लाख ८० हजार ९६८ सुपारी मिश्रीत पानमसाला, वि १ तंबाखू कंपनीचे तंबाखू व मारुती डिझायर कंपणीची पांढऱ्या रंगाची कार असा मुद्देमाल मिळून आला. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
त्यानंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत व वाहनांचे मालकाबाबत ताब्यात आनंत विलास भालेकर याला विचारपूस केली असता त्यांनी मारुती डिझायर कार नंबर (एमएच २५ एल ७७७३) ही माझ्या मालकीचे आहे.  त्यामध्यील माल इसम जमील शेख ( रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद (फरार) (पुर्ण नाव माहित नाही ) याचे मालकीचा असल्याचे सांगितले.
आरोपी हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखू विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द  स्थानिक गुन्हे शाखेचे  पोकाँ कमलेश हरिदास पाथरुट यांच्या फिर्यादीवरून  तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं. ७७५/२०२१ भादिव कलम १८८, २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही  तोफखाना पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments