Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गाजांची लागवड करुन मशागत करणा-यास अटक : साडेतीन लाखांचा गांजा जप्त ; अकोले पोलीसांची कामगिरी

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अकोले  गाजांची लागवड करुन मशागत करणा-यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून ३ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा अवैध्य गांजा जप्त करण्याची मोठी कारवाई अकोले पोलीसांनी केली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याबरोबर अजून कोणी साथीदार आहे काय ?  याचा पोलीस तपास करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस ठाण्याचे सपोनि तथा प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, अकोले पोलीस ठाण्याचे  सफौ सुनिल साळवे, पोना अजित घुले, चालक पोना गोविंद मोरे, पोना बाळासाहेब गोराणे, पोका आनंद मेड, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ कुलदिप पर्बत, पोकॉ सुहास गोरे, पोका प्रदिप बढे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 7 सप्टेंबर रोजी मोग्रस (ता अकोले) या गावाचे शिवारातील ठाकरवाडी परिसरात  शंकर काळु पारधी हा त्याचे वालवडीचे शेताचे बांधावर अवैधरित्या गांजाची लागवड करुन ती बाळगत असल्याची गोपनिय माहिती सपोनि मिथुन घुगे यांना मिळाली होती.  माहितीबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर,  उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांना माहिती दिली  त्यांचेकडुन छाप्याबाबत परवानगी घेतली. यानंतर त्या ठिकाणी राजपत्रीत अधिकारी  व्ही व्ही खतोडे, नायब तहसिलदार व स्टाफ असे कारवाईसाठी रवाना झाले.  त्या ठिकाणी जाएन खात्री केली असता, तेथे  24 किलो 300 ग्रॅम वजनाचे रुपये 3 लाख 64 हजार 500 रुपयांचे 16 गांज्याची लहान मोठी झाडे मिळून आली. तसेच गांज्याची लागवड तसेच त्याची मशागत करणारा शंकर काळु पारधी (रा मोग्रस ता. अकोले जि अ.नगर) याला ताब्यात घेण्यात आले. याच्याविरुध्द अकोले पोलीस ठाण्यात  गुरनं 344/2021 एनडीपीएस कायदा 1885 चे कलम 20(क) (ख) (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.  त्याला बुधवारी ( दि.८)  न्यायालयात हजर केले असता  न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी मंजुर केली.  त्यास अजुन कोणी साथीदार आहे काय ?  याचा पोलीस तपास करीत आहेत.
👉गांज्याची माहिती पोलिसांना
        सांगा : एसपी  मनोज पाटील
आपले गावात किंवा परिसरात कोठेही अवैध्य गांज्याची झांडाची लागवड, विक्री अथवा वाहतूक होत असेल तर तात्काळ पोलीस ठाणेस कळवा, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन जिल्हा  पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments