Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चांदा येथे दरोडा टाकणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नेवासा- तालुक्यातील चांदा शिवारातील वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना घातक शस्त्राने मारहाण करुन दरोडा टाकणारे आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. डांगर उर्फ प्रविण छगन भोसले (रा. मुर्कीदपूर झोपडपट्टी, मराठी शाळेजवळ, नेवासा फाटा, ता. नेवासा),  सुदाम उर्फ शिवदास सुदमल भोसले ( रा. गेवराई, ता. नेवासा),  पंकेश उर्फ पंक्या जगताप भोसले (रा. फत्तेपूर, ता. नेवासा) यांना नेवासा फाटा परिसरातून वेगवेगळ्यां ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना शंकर चौधरी, पोकॉ रणजित जाधव, प्रकाश वाघ, सागर ससाणे, जालिंदर माने, चालक पोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजीचे मध्यरात्री कुटूंबासह घराचे पडवीमध्ये व घरामध्ये झोपलेले असताना अज्ञात ६ ते ७ चोरट्यांनी हातामध्ये काठ्या, तलवारी व भाले  याने मारहाण करुन तसेच शेजारी राहणारे फिर्यादीचे भाऊ किसन एकनाथ गायकवाड तसेच जवळच राहणारे साक्षीदार देविदास जाधव आडभाई यांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देवून दरवाजाच्या कड्या उघडण्यास भाग पाडून मारहाण करुन घरातील कपाटे, साक्षीदार किसन गायकवाड यांचा मोबाईल व घराबाहेरील इलेक्ट्रिक ट्युब फोडून नुकसान करुन फिर्यादी व साक्षीदार यांचे घरातील व महिलांचे अंगावरील सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २ लाख ६६ हजार  रु. किं. चा मुद्देमाल दरोडा टाकून चोरुन नेला होता, या नारायण एकनाथ गायकवाड ( रा. चांदा शिवार, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून  सोनई पोलिस ठाण्यात गुरनं. २९२/२०२१ भादवि कलम ३९५, ४२७ सह आर्म अॅक्ट कलम ४ / २५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग व
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी
गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक पाटील यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपास करणेबाबत पोनि  अनिल कटके यांना सूचना दिल्या. त्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि  अनिल कटके यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणान्या व स्थानिक गुन्हे शाखेच्या अभिलेखावर असलेल्या सराईत गुन्हेगारांचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना दाखविले. त्यातील काही फोटो फिर्यादी व साक्षीदार यांनी ओळखल्यानंतर
पोलिस पथकाने असे आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन आरोपींचा शोध घेवून आरोपी  डांगर उर्फ प्रविण छगन भोसले,  सुदाम उर्फ शिवदास सुदमल भोसले, पंकेश उर्फ पंक्या जगताप भोसले यांना नेवासा फाटा परिसरातून वेगवेगळ्यां ठिकाणाहून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांचा व त्यांचे इतर दोन साथीदारांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून येत असल्याने आरोपींना सोनई पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही सोनई पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments