Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागपूर महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी सदस्यपदी सभापती सुनिल गडाख पा.


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंर्वधन समितीचे सभापती सुनिल गडाख पा. यांची महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विदयापीठ नागपूर या विदयापीठाच्या कार्यकारी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
विदयापीठाचे प्रतीकुलपती तथा पशुसंर्वधन व दुग्धविकासमंत्री मा सुनिल केदार यांनी नाशिक महसूल विभागातून सभापती वर्गवारी मधून सदर विदयापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे.  नियुक्तीच्या संदर्भाने जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पा., उपाध्यक्ष प्रतापराव शेळके पा., सभापती काशिनाथ दाते,  उमेश परहर, सौ. मिराताई शेटे, सभापती पं.सं. नेवासाचे कांगुणे , सभापती पं.स.पाथर्डी सौ. सुनिताताई दाँड, सभपती पं.स. अकोले सौ. उर्मिला राऊत, सर्व अधिकारी जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य पशुवैदयक संघटना अहमदनगर यांचे वतीने सभापती सुनिल गडाख पा. यांचे अभिनंदकेले आहे.

Post a Comment

0 Comments