Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वस्तधान्य दुकानातील माल विल्हेवाट लावण्याचा प्रकार ग्रामस्थांनी उधाळला ; शेवगाव तालुक्यातील घटना

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बोधेगाव -   शेवगाव पुरवठा विभागातील गैरकारभार चव्हाट्यावर आला असतानाच रविवार (दि.१२) तालुक्यातील बालमटाकळी येथे स्वस्त धान्य दुकानातील माल रिकाम्या बारदाण्याच्या वाहनातून विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडण्यात आला. घटनेची माहिती शेवगावच्या तहसिलदार अर्चना पागिरे यांना दिल्यानंतर नायब तहसिलदार व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानातील धान्य साठ्याचा पंचनामा करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, बालमटाकळी येथे स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे स्वस्त धान्य दुकान मंगरूळ येथील  शिवाजी शंकर काकडे हे स्वस्त धान्य दुकान चालवितात. शनिवारी धान्य वाटप सुरू असताना ग्राहकांची दुपारी गर्दी कमी झाल्याने दुकानदाराने (एम एच १६ सीए ०६०४) या  क्रमांकाच्या चारचाकी टेम्पो बोलावून त्यामध्ये रिकाम्या बारदाण्याचा भरणा केल्याचा बहाणा करून दुकानातील गहू, तांदुळाचे ५० किलोचे असंख्य  पोते टेम्पोत टाकून घेऊन जात असताना दिगंबर पोपळघट, अन्वर शेख, लक्ष्मण फाटे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी सिनेस्टाईलने रंगेहात पकडले.या घटनेचा  सर्व  व्हिडीओ यावेळी  काढण्यात आला. या घटनेची माहिती ग्रामस्थांमध्ये  होताच,  दुकानासमोर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती दिगंबर पोपळघट यांच्यासह इतर युवकांनी शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर घटनास्थळी  सुमारे दीड तासांनी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे, पुरवठा विभागाचे साळुंखे हे  दाखल झाले. तोपर्यंत दुकानासमोर ग्रामस्थांनी मोठी  गर्दी केली होती.  आलेल्या संबधित अधिकाऱ्यांनी या घटनेचा ग्रामस्थ समवेत पंचनामा केला असता, स्वस्त धान्य दुकानात ५० किलोच्या २४ गोण्या आढळून आल्या. 
त्याचा दिगंबर टोके, परमेश्वर शिंदे,मधुकर पाटेकर, संदीप शिंदे, बाळासाहेब देवढे, या ग्रामस्थांच्या उपस्थित समक्ष  पंचनामा करण्यात आला. मात्र सदर दुकानदारांनी पॉश मशीनचा वापर न करता धान्याचे वाटप केले जात असून व ग्राहकांना  धान्य दिले तर रीतसर पावत्या दिल्या जात नाहीत, असा आरोप ग्रामस्थ शेखर बामदळे यांनी अधिकाऱ्यांसमोर यावेळी  केला.  स्वस्त धान्य चालक शिवाजी काकडे या दुकानदारांनी पॉश मशीन गायब केले.  गावात नोंदणीसाठी पाठवले आहे, अशी खोटी माहिती ग्रामस्थांना व अधिकाऱ्यांना दिली. ग्रामस्थांना दुकानदाराने उडवाउडवीच्या उत्तर दिल्यामुळेच ग्रामस्थ संतप्त झाले होते. सदर मशीन घेऊन या अशी ग्रामस्थांनी जोरदारपणे मागणी केली, पण मशीन बाहेर गेले असे खोटे दुकानदारांनी सांगितले. सदर पॉश मशीन दुकानदाराच्या जवळ असलेल्या पिशवीची ग्रामस्थांनी झडती घेतल्याने त्यामध्ये स्पॉश मशीन आढळून आल्याने ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी संबंधित दुकानदाराला व अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. संबंधित दुकानदाराच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. पॉश मशीन संबधित अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये काय निष्पन्न होईल, तसेच वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
👉संकलन : बाळासाहेब खेडकर

Post a Comment

0 Comments