Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळेचे बनावट दाखले व निकालपत्रे तयार करुन देणारी टोळी जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी- सैन्यदलातील भरतीसाठी शाळेचे बनावट दाखले व निकालपत्रे तयार करुन देणारी टोळी पाथर्डी येथे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाल शेवगाव उपविभागीय पो.अ. सुदर्शन मुंढे, स्थागुशा पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थागुशाचे सपोनि सोमनाथ दिवटे. पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना रवि सोनटक्के, शंकर चौधर, पोकॉ विनोद मासाळकर, प्रकाश वाघ, सागर ससाणे, चालक पोहेकॉ बबन बेरड यांचेसह पाथर्डीचे पोसई श्रीकांत डांगे, सफौ बाबर, पोहेकॉ दळवी, रोकडे आदिंसह पोलीस कर्मचा-यांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,  दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी मिलेटरी इंटेलिजन्स (देवळाली कॅम्प, नाशिक) यांनी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय, अहमदनगर येथे पोनि अनिल कटके यांची भेट घेवून माहिती दिली कि, पाथर्डी शहरातील शनिचौक ते नाथनगर जाणारे रस्त्यालगत मारुती शिरसाठ व त्याचे काही साथीदार हे पैसे घेवून शाळेची बनावट कागदपत्रे तयार करुन देतात व सदर कागदपत्रांच्या आधारे काही युवकांनी सरकारी नोकऱ्या मिळविलेल्या आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाली असून त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करावयाची आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाथर्डी पो.स्टे. येथे जावून प्रभारी अधिकारी, पाथर्डी पोलीसांना मिळालेली माहिती देवून पाथर्डीचे पोसई श्रीकांत डांगे, सफौ बाबर, पोहेकॉ दळवी, रोकडे यांना मदतीस घेवून दोन पंचासह छाप्याचे नियोजन करुन  ठिकाणचे जवळ जावून मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी बनावट गिऱ्हाईक तयार करुन त्याचेकडे निशाणी केलेली २००० रु. ची नोट देवून बातमी मधील इसम मारुती सिरसाठ याचेकडे जावून शाळेचा दाखला तयार करुन घेण्यास सांगीतले. मारुती सिरसाठ याने शाळेचा दाखल तयार करुन दिल्यास तात्काळ पथकातील अधिकारी व अंमलदार यांना इशारा करणे बाबत बनावट ग्राहकास सूचना देवून पाठविण्यात आले व पथकातील अधिकारी व अंमलदार हे बनावट ग्राहकाचे नजरेस येतील अशा रितीने दबा धरुन थांबले. बनावट ग्राहकाने शनि चौक ते नाथनगर जाणारे रस्त्याचे कडेल असलेल्या एका दुमजली इमारती मध्ये जावून मारुती सिरसाठ यास २००० रु. देवून त्याचेकडून बनावट शाळेचा दाखला तयार करुन घेवून पथकातील अधिकारी व अंमलदार यांना इशारा केला. त्याचवेळी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह सदर ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांना पथकातील अधिकारी,अंमलदार व पंचाची ओळख देवून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते १) मारुती आनंदराव शिरसाठ  (वय ५२, रा. जांभळी, ता. पाथर्डी,  दत्तू नवनाथ गर्जे (वय ४०, रा. अकोला, ता. पाथर्डी) असे असल्याचे सांगितले. त्यांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश समजावून सांगून पंचासमक्ष त्यांची व सदर ठिकाणची झडती घेतली. त्या ठिकाणी संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय, अकोला (ता. पाथर्डी) याचे विद्यालयाचे शाळा सोडल्याचे दाखल्याचे प्रत्येकी ५० पाने असलेली दोन पुस्तके, संत भगवान बाबा कनिष्ठ महाविद्यालय, अकोला, ता. पाथर्डी याचे विद्यालयाचे शाळा सोडल्याचे दाखल्याचे प्रत्येकी ५० पाने असलेली दोन पुस्तके, संत भगवान बाबा कनिष्ठ महाविद्यालय या नावाचे लेटरपॅड असलेले ५० पान असलेले पुस्तक, संत भगवानबाबा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, घाटशीळ पारगाव, ता. शिरुर कासार, जि. बीडचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राचे पुस्तक, विवीध शाळांचे निकाल असलेले व वेगवेगळ्या विद्याथ्र्यांचे नावे असलेले निकालपत्र, वाह्या, मुख्याधापक, भगवानबाबा माध्यमिक विद्यालय, अकोला, ता. पाथर्डी असे नांव असलेला गोल शिक्के, मुख्याधापक, नागनाथ विद्यालय, पिंपळगाव, ता. पाथर्डी या नावाचा
गोल शिक्का, प्राचार्य, संतभगवानबाबा महाविद्यालय, घाटशिळ पारगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड या नावाने गोल इंग्रजी शिक्का, मुख्याधापक, जि.प.प्राथ. शाळा, पाथर्डी या नावाचा शिक्का, मुख्याधापक, चिंचप इजदे, ता. पाथर्डी या नावाचा शिक्का, मुख्याधापक, मोहरी, ता. पाथर्डी या नावाचा शिक्का असे वेगवेगळ् शाळेचे, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे नावे असलेले शाळा सोडल्याचे दाखल्यांचे पुस्तके, शिव, संगणक व प्रिन्टर मशिन तसेच बनावट ग्राहकाने दिलेली २ हजार  रु. रकमेची नोट तसेच बनावट ग्राहक यांन तयार करुन नागनाथ विद्यालय, पिंपळगाव टप्पा, ता. पाथर्डी या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला असा एकूण ४९ हजार  रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला.
त्यानंतर ताब्यात घेतलेल्या वरील नमुद इसमांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी  कुंडलीक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी, ता. पाटोदा, जि. बीड),  मच्छिन्द्र निकम ( रा. मानूर, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे आम्ही बनावट कागदपत्रे तयार करुन देत असून यापूर्वी  अजय उर्फ जय राजाराम टिळे, (रा.वाडीवरे, ता. इगतपूरी, जि.नाशिक) व  शांताराम पंढरीनाथ अनाथे (रा. पिंपळद, ता. जि. नाशिक) यांना सैन्यदलामध्ये नोकरी मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचे बनावट दाखले तयार करुन दिले असल्याचे सांगितले.
आरोपी यांनी वनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन ते खरे असल्याचे भासवून त्याचा गैरवापर करुन सैन्यदलामध्ये नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केलेली असल्याने सदर बाबत पोकॉ विन शिवाजी मासाळकर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांनी पाथर्डी पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरन ६७३/२०२९ भादवि कलम ४२०, १२० (ब), ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही पाथर्डी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments