Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीडच्या सराईत चोरट्याला घरफोडी प्रकरणी 8 दिवस पोलीस कोठडी ; कर्जत पोलिसांची कामगिरी

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत - बीडच्या सराईत चोरट्याला पकडण्यात आले असून, त्या चोरट्यास पोलिसांनी न्यायालायासमोर उभे केले असता, त्या चोरट्याला घरफोडी प्रकरणी 8 दिवस पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.  ही कर्जत पोलिसांनी  कामगिरी केली आहे. शिक्षा झालेला सोयब कमरोउद्दीन शेख (वय - 26 ) असे त्याचे नाव आहे. तर उर्वरित  फारुख शेख, सलमान शेख ही दोघे चोरटे फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत  उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे  पोनि चंद्रशेखर यादव, पोउपनि भगवान शिरसाठ, पोकाॅ अंमलदार, तुळशीदास सातपुते, सागर म्हैत्रे, गणेश ठोंबरे, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, देवीदास पळसे, गणेश भागडे, संभाजी वाबळे, मारुती काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 28 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे 3 वा कर्जत पोलीस स्टेशन ठाणे हद्दीतील  राशीन गावामध्ये राशीन ते करमाळा रोडवरील साईराज मशिनरी नावाचे दुकान कोणीतरी अज्ञात तीन चोरट्यांनी फोडून दुकानातील जुन्या व नव्या कॉपरच्या वायरी किंमत अंदाजे 3 लाख 80 हजार रुपयाच्या चोरून घेऊन गेले होते, या राहुल आबासाहेब जांभळकर (रा. राशीन, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस पथकाने तपासत राशिन, कोर्टी, करमाळा, नान्नज, जामखेड, सौताडा, पाटोदा, मांजरसुंबा, बीड शहर या ठिकाणी सीसीटिव्ही चेक केले. त्यावरून राशीन वरून करमाळा रोडने जामखेड मार्गे बीडकडे आरोपी गेल्याचे त्यांनी तपासात निष्पन केले.  त्यांनी गुन्ह्यात एका (Mh 03 BC 3243) या क्रमांकाची स्विप्ट गाडी वापरल्याचे शोध घेतला . त्यानंतर पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ तुळशीदास सातपुते,  पोकाॅ  सागर म्हैत्रे, गणेश ठोंबरे, भाउसाहेब काळे यांनी दि.4 व दि.5 ऑगस्ट  रोजी बीड येथे जाऊन बीडमधील  मोमीनपुरा भागातील सराईत गुन्हेगार सोयब कमरोउद्दीन शेख, फारुख शेख,  सलमान शेख  यांना गुन्ह्यात निष्पन्न  करून यांच्यापैकी सोयब कमरोद्दीन शेख याला पकडण्यात यश आले. उर्वरित दोघे फरार झाले. या चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी व 73 हजार 950 रु ची तीन गोण्या 147 kgs कॉपर वायर जप्त करण्यात आली. कर्जत पोलिसांनी सतत आणि सलग दहा दिवस गुन्ह्याचा वेगवेगळ्या प्रकारे तपास करून आरोपी निष्पन्न करून बीडमधून अटक केले.या आरोपींवर यापूर्वी बीडमध्ये चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
👉व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी आपल्या दुकानात आणि परिसरामध्ये जास्तीत जास्त सीसीटीव्ही लावून घ्यावे. जेणेकरून असा कोणताही प्रकार घडल्यास आपल्याला आरोपी निष्पन्न करणे आणि आरोपी अटक करणेकामी मदत होईल. पुढील काळात होणाऱ्या चोऱ्या सुद्धा थांबविता येतील.
-- पो.नि.चंद्रशेखर यादव (कर्जत पोलीस ठाणे)

Post a Comment

0 Comments