Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहशत माजविणा-यांना कर्जत पोलीसांनी केले गजाआड ; 4 दिवस पोलीस कोठडी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत -  तालुक्यातील पाटेगाव येथे दहशत करणा-या दोघांना कर्जत पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर सोमवारी (दि.6) हजर केले असता,  दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अक्षय प्रभाकर डाडर,  समाधान सर्जेराव डाडर (दोघे रा. पाटेगाव ता.कर्जत) अशी शिक्षा सुनावणा-यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत  उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पो.नि. चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोउनि अमरजित मोरे, पोना श्याम जाधव, पोकाँ गोवर्धन कदम, पोकाँ महादेव कोहक, पोकाँ संतोष फुंदे, चापोकाँ शकिल बेग आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, कर्जत  पोलीस ठाणे  हद्दीतील पाटेगावात दहशत करणारे   अक्षय प्रभाकर डाडर,  समाधान सर्जेराव डाडर (दोघे रा. पाटेगाव ता.कर्जत) याचेतील आरोपी अक्षय याचे पाटेगाव गावात चिकनचे दुकान आहे. फिर्यादी चंद्रकांत प्रकाश साबळे यांनी पाटेगाव गावात चिकनचे दुकान नव्याने सुरू केले. तक्रारदार यांनी नवीन दुकान का टाकले असे म्हणून फिर्यादी चंद्रकांत प्रकाश साबळे व फिर्यादीचे चुलते संदिप साबळे यांना त्रास देणे सुरू करून कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले. या घटनेची माहिती होताच पोनि चंद्रशेखर यादव यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे   पोउनि अमरजित मोरे, पोना श्याम जाधव, पोकाँ गोवर्धन कदम, पोकाँ महादेव कोहक, पोकाँ संतोष फुंदे, चापोकाँ शकील बेग असे घटनास्थळी रवाना करून आरोपी ताब्यात घेण्यास सांगितले.  आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. पोउनि अमरजित मोरे यांनी आरोपींना  न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी  अक्षय प्रभाकर डाडर,  समाधान सर्जेराव डाडर या दोघांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
अक्षय डाडर याच्यावर यापूर्वीचा 1 गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोउप अमरजित मोरे, कोहक हे करीत आहेत.

👉कोणाचीही दादागिरी नको
कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांवर कोणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही. असा काही प्रकार असल्यास नागरिकांनी कर्जत पोलिसांशी संपर्क करावा.
- पो.नि.चंद्रशेखर यादव, कर्जत 

Post a Comment

0 Comments