Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरट्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; कर्जत पोलिसांची कामगिरी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत - तालुक्यात 3 ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यास कर्जत पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. चोरट्यास न्यायालयासमोर उभे केले असता,  न्यायालयाने त्याला  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कर्जत  उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार अहमदनगरला पोउनि अमरजीत मोरे, पोहेकाँ बबन दहिफळे, पोना जितेंद्र सरोदे, पोकाँ गणेश काळाणे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मिरजगाव दुरक्षेत्र येथे एक इसम संशयित आहे. त्याच्याकडे चोरीचे साहित्य आहे, अशी माहिती कर्जत  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मिळाली. श्री यादव यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या.  पोलिस पथक हे इसमास ताब्यात घेणेकामी तातडीने  रवाना झाले.  माहितीतील वर्णनाचा इसम  मिरजगाव बसस्थानक परिसरात मिळून आला.  त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रमोद उर्फ नारायण काकासाहेब पठाडे (रा.जालना) असे सांगितले. सदर इसमाची झडती घेतली असता, त्याच्याकडे पाथर्डी मधील चोरी केलेला एक मोबाईल, नगर मधून चोरी केलेला एक मोबाईल आणि जालना या ठिकाणी चोरी एक मोटर सायकल 1 लाख 5 हजार  किमतीचा मुद्देमाल मिळून आला.  आरोपीविरुद्ध पोशि गणेश काळाणे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. कर्जत पोलिसांनी आरोपी पठाडे याला न्यायालायासमोर उभे केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments