Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परमबीर सिंह मुंबई CP होणार हेच सांगत वाझेंनी वसुली सुरू केली, बिल्डर बिमल अग्रवालचा गौप्यस्फोट

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलिस परमबीर सिंह आणि निलंबित एपीआय सचिन वाझे या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात दिलेल्या खंडणीविरोधी तक्रार जबाबात नवा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नेमणूक आणि सचिन वाझे यांचा पोलीस दलातील समावेशाबाबतचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. माझे खास बॉस परमबीर सिंह हे मुंबईमध्ये सी पी म्हणुन येणार आहेत, तु तुझा हॉटेल व्यवसाय पुन्हा चालु कर, बाकी मी बघुन घेईन. कलेक्शनचे काम माझेकडेच येणार आहे, असेही सचिन वाझेंनी सांगितल्याचे बिमल अग्रवाल यांनी नोंदवलेल्या जबाबात म्हटले आहे.
वाझे बोलले तस घडत गेल
सचिन वाझे यांनी सांगितल्यानुसार परमबीर सिंह हे ३१ मार्चरोजी मुंबई सी पी म्हणुन नियुक्त झाले. तेव्हा सचिन वाझे यांनी परमबीर सिंह हे सीपी मुंबई झाल्यामुळे आता थोड्याच दिवसांत परमबीर सिंह साहेब सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस खात्यात जॉईन करून घेणार असल्याचे सांगितले. आगोदर सचिन वाझे यांनी सांगितल्यानुसार परमबीर सिंह मुंबई सी पी झाल्यानंतर त्यांच्याच सांगण्यावरून सचिन वाझे यांना पोलिस खात्यात जॉईन करून घेतल्याचेही अग्रवाल यांनी आपल्या जबाबात नोंदवले आहे.
 १ नंबरकडून दिवसाला २ कोटींचे टार्गेट
सचिन वाझे यांनी मला सांगितले की मला १ नंबरने सांगितले आहे की, कोरोना मुळे त्यांचे ६ महिन्यांच्या कमाईचे नुकसान झाले आहे वी ती नुकसान भरपाई करायला दिवसाला २ कोटी कलेक्शनचे टार्गेट दिले आहे. मला एक नंबरकडून खूप प्रेशर आहे, तु मला हॉटेल, बार आणि बुकी यांच्याकडून कलेक्शनबाबतची माहिती देवुन मदत कर, नाही तर तुझी हॉटेल्स पण चालू देणार नाही. एस एस ब्रॅंच तर मीच चालवतो. मी वाटेल तेव्हा एस एस ब्रॅंचला कोणत्यापण हॉटेलवर रेड करायला लावेन आणि तुझा सगळा धंदा चौपट होऊन जाईल असे सचिन वाझे यांनी मला सांगितले. त्यावेळी हॉटेल व बार कलेक्शनसाठी महेश शेट्टी योग्य असल्याचे मी सांगितले. तसेच बुकींच्या कलेक्शनसाठीचे काम नारायणभाई व्यवस्थित करतील असेही मी सांगितले. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२० ला नारायण भाईंना सचिन वाझे वाझेंनी युनिट ११ च्या ऑफिसला बोलावून घेतले. सचिन वाझे यांनी माझेसमोर नारायण भाई यांना सांगितले की, इथुन पुढे मुंबईचे सर्व बुकींचे कलेक्शन फक्त सी पी परमवीर सिंह यांना द्यायचे आहे. ते सर्व तुम्ही जमा करायचे आहे. त्यातील ७५ टक्के पैसे १ नंबरला जाणार व बाकीच्या २५ टक्के आम्ही एकत्र वाटुन घेवु. सचिन वाझे यांनी आम्हाला सांगितले की १ नंबरने सांगितले आहे की त्यांचे ६ महिन्यांच्या कमाईचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ती नुकसान भरपाई करायला २ कोटी कलेक्शनचे टार्गेट आहे. सगळ्या बुकींची सेटींग करायलाही सांगितली आहे.
परमबीर सिंह यांनी दिवसाला २ कोटी रूपये जमा करण्याच्या दिलेल्या टार्गेटप्रमाणे सचिन वाझे यांचे प्रयत्न सुरू होते. पण हॉटेल , बारची आणि बुकींची सेटलमेंट झाली नाही त्यामुळे सचिन वाझे यांनी त्यांच्या पथकांसह कारवाई करण्यास सुरूवात केली. सचिन वाझे यांच्या मागणीनुसार पैसे न दिल्याने ३ फेब्रुवारी २०२१ ला त्यांनी माझी भागिदारी असलेल्या गोरेगाव येथे BOHO रेस्टॉरंट बारवर पथकाच्या मदतीने धाड टाकली. पण हा विषय संपवण्यासाठी मी फोन केला असता त्यांनी माझ्यासोबतच्या भागिदारांकडून साडेचार लाख रूपये उकळले.
तर माझाही मनसुख हिरेन करतील
यापूर्वी मी केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला समोरे गेलो आहे. त्याचा मला खूपच त्रास झाला आहे. त्यामुळे मला पुन्हा सीबीआय, ईडी अडकवतील अशी भिती मला वाटली. तसेच परमबीर सिंह यांना महाराष्ट्राचे डी जी करणार असल्याची बातमी आली. त्यामुळे मी तक्रार केल्यास पुन्हा हॉटेल व्यवसाय अजचणीत येईल अशी भीती मला वाटली. त्यामुळेच घाबरून मी तक्रार दिली नाही असाही जबाब अग्रवाल यांनी दिला आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रारीसाठी लोक पुढे येत असल्यानेच ही तक्रार मी धाडस करून देत आहे. मला भीती आहे की परमबीर सिंह, सचिन वाझे व त्याचे सहकारी माझा मनसुख हिरेन करतील. त्यामुळे मला व माझे परिवाराला पोलिस संरक्षण देखील देण्यात यावे अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments