Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ परिसरात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
चिंचपुर पांगुळपाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ परिसरात रात्रभर जोराचा पाऊस झाला. येथे  अनेक ठिकाणी ऊस,तूर व बाजरीचे पिके पडली आहेत .उडीद,मूग पिकं तर पावसाने पूर्णपणे वाया गेले आहेत. यामुळे  पिकांचे मोठे नुकसान झाले  आहे. प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.

परिसरात अनेक ठिकाणचे नद्या,नाले ओसंडून वाहत आहेत.त्यामुळे बेलपारा तलाव भरण्यास मदत होणार आहे. चिंचपुर पांगुळ येथील पाथर्डी मार्गावरील  पूल देखील पाण्याखाली गेल्याने ढासळला आहे. त्यामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिपळगाव टप्पा येथील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाली झाडे पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे कालरात्री पासून सुरू झालेला पाऊस न थांबता  विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत देखील चालूच होता.
संकलन-
पत्रकार सोमराज  बडे 
मोबा-9372295757

Post a Comment

0 Comments