Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिस अधिकारी वाळू तस्कारात "अर्थ'पूर्ण संवाद

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर/ व्हिडिओ 
नेवासे :  वाळू तस्करी करणाऱ्यांना वाहनांसह पळून जाण्याचा सल्ला देण्याचा सल्ला दिल्याची मोबाईलवरून संभाषणाची क्‍लिप नेवासे तालुक्‍यात चांगलीच व्हायरल झाली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिस अधिकारी आणि वाळू तस्करांमधील संभाषणाची क्‍लिप सध्या नेवासे तालुक्‍यात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने वाळू तस्कराशी मोबाईलवर संपर्क साधला आहे. आपण आता पोलिस ठाण्यातून वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी निघालो आहोत, मी तेथे येण्याच्या अगोदर सर्व वाहने घेऊन जा. तेथे आल्यावर जी वाहने सापडतील, त्यावर आपण कारवाई करू. तुम्हाला आता मी सांगेपर्यंत आता थांबा, अशा स्वरुपाचे हे संभाषण आहे.

👉सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मोबाईलवरील संभाषण क्‍लिपची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितावर कारवाई केली जाणार आहे.
मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

📲 व्हायरल झालेले संभाषण याप्रमाणेः
""अधिकारीः पिंपळगावमध्ये उच्छाद मांडला तुम्ही
वाळू तस्करः नाही सर, आम्ही नव्हतो, साहेब
अधिकारीः कोणी असतील, जे नालायकांमुळे आता सगळ्यांच बंद करण्याची पाळी आली आहे, आता मी पोलिस स्टेशनमधून निघालोय आता. मी पोहचायच्या आत आता जेवढी वाहने काढून घेऊन जाता येतील, तेवढी वाहने घेऊन जायची. कायम स्वरुपीपण. पुढील माझा आदेश येत नाही, तोपर्यंत
वाळू तस्करः जी सर, जी.
अधिकारीः मी निघाणार आहे. जेवढी वाहने असतील, तेवढी वाहने मी सील करणार आहे, जप्त करणार आहे.
वाळू तस्करः जी सर, जी.''

Post a Comment

0 Comments