Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिस आरोपीला घेऊन जाताना हल्ला ; आरोपी गंभीर जखमी

 



👉नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांना घटनेची चौकशीचे आदेश 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - कलम 376 सारख्या गुन्ह्यातील आरोपी सादीक बिराजदार याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस गाडीत आरोपी बिराजदार याला नेत असताना पोलिस गाडी आडवून त्याला झालेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार (दि.15) सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास  भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत घडली. परंतु या गंभीर घटनेनंतरही पोलिसांकडून अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. पण या गंभीर घटनेची तातडीने वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन आदेश दिल्यानंतर रात्री उशिरा 5 जणांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  या घटनेविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना पञकारांनी विचारले असता, श्री पाटील म्हणाले,  एकाच घटनेचे पळून जाण्याचा व मारहाणीचा अशी दोन स्वतंत्र  गुन्हे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या गंभीर घटनेची चौकशी करण्यासाठी नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
जखमी आरोपींची बायको रुक्सार सादीक बिराजदार  हिने  भिंगार पोलिस ठाण्यात दि.15 ऑगस्टच्या रात्री  सायंकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या दरम्यान पती सादीक बिराजदार, सासू हुरबानो लाडलेसाहब बिराजदार, दोन लहान मुले असे आमच्या घरी असतांना घराचे दार वाजवून सादीक असा आवाज दिला.  तेव्हा पती सादीक बिराजदार यांनी घराचा दरवाजा उघडला असता, भिंगार कम्प पोलीस ठाण्याचे दोन पोलीस होते. त्यांनी पतीस त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात  येण्यास सांगितले. पती त्यांच्यासोबत घराच्या खाली गेले, तेव्हा मी घराच्या बाहेर आले असता, पोलिसांनी मला सांगितले की, तुम्ही जामीन करण्यासाठी पोलिस ठाण्यात या, असे सांगून पोलिस पतीस पांढ-या गाडीतून घेऊन गेले. मी लगेच माझ्या मोबाईलवरून पतीच्या मोबाईलवर फोन लावला. त्याच्या सोबत असणारा असलेला आजीम उर्फ मुनीय सय्यद याने आमच्या समोर कुणाला तरी फोन लावून रशीद, सादीक को पोलीस लेके जारी तुम आवो पिछेसे दंडे लेके, असे म्हणाला. त्याच्याकडील मोटार सायकलवरुन येथून निघून गेला. त्यानंतर मी माझी मामेसासू तसलीम शेख व माझे मामे सासरे रोशनमिय शेख असे तिघे लगेच रिक्षाने त्यांच्यामागे पोलीस ठाण्यास येण्यासाठी निघालो. दरम्यान, आम्ही भिंगारनाल्याजवळ येत असतांना पोलीसांची गाडी थांबली असल्याचे दिसले. त्यावेळी तेथे बाजुलाच एक रिक्षा सुध्दा त्या ठिकाणी थांबलेली दिसली.  चार ते पाच लोक त्यात मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद,  अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद (सर्व रा. दर्गादायरा, मुकुंदनगर, अहमदनगर)  हे सादीक याला पोलीसांचे गाडीतून बाहेर काढून लोखंडी राॅडने डोक्यात व इतर ठिकाणी मारहाण करतांना रोडच्या लाईट उजेडात दिसले. त्यानंतर पोलीसांनी त्याला गाडीमध्ये बसवून घेऊन गेले. यानंतर माझ्या मोबाईलवरून पतीच्या मोबाईलवर फोन लावला. तो फोन मैनुद्दीन पोलीस यांनी उचलला व तुमच्या नव-याचा अपघात झाला असून, त्याला सिव्हील हॉस्पिटला नेत असल्याबाबत सांगितले. त्यानंतर आम्ही सिव्हील हॉस्पिटल येथे गेलो. सिव्हील हॉस्पिटल येथे गेलो असता,  पती सादीक हे बेशुध्द अवस्थेत होते.  त्यांचे सिटीस्कन करुन त्यांना दुस-या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले, म्हणून  पतीस मॅक्सकेअर हॉस्पिटल, झोपड़ी कॅटीनजवळ येथे नेवून उपचासाठी ॲडमीट केले. 

 दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 वाजेचे दरम्यान  पती सादीक बिराजदार यांना आमचे घरापासून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात  घेऊन जात असतांना भिंगार नाल्याजवळ पती सादीक यास रिक्षातून आलेले मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद,  रशीद रसुल सय्यद,  कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद (सर्व रा.दर्गादायरा, मुकुंदनगर, अहमदनगर ) यांनी पोलीस गाडीतून खाली उतरवून लोखंडी रडने डोक्यात व इतर ठिकाणी मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदरची मारहाण ही मी रोडवरील लाईटचे उजेडात पाहिलेली आहे, हा जबाब आरोपी च्या पत्नीचा तपासात महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे या गंभीर घटनेची अधिक चौकशी झाल्यास अनेक गोष्टीचा उलगडा होणार आहे.



Post a Comment

0 Comments