Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- राहुरी कारखाना येथे गावठी कट्टा बाळगणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पकडले. प्रेम पांडूरंग चव्हाण ( वय ३७  रा. बाजारतळ, दुबे गल्ली, वार्ड नं. ६, श्रीरामपूर) असे पकडण्यात असलेल्याचे नावे आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार अहमदनगरला  पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ रविन्द्र घुंगासे, सागर ससाणे, रोहीत येमूल, चालक पोहेको उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
शुक्रवारी (दि.२०) स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके यांना राहुरी ते राहूरी कारखाना जाणारे रोड लगत असलेल्या साक्षी हॉटेल येथे एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी घेवून येणार आहे, लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. पथकाने सापळा लावून प्रेम पांडूरंग चव्हाण याला पकडण्यात आले. त्याची पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार  रु. किं. चा मुद्देमाल मिळून आला. तो पोलिसांनी जप्त केला.
पोहेकॉ मनोहर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिस ठाण्यात गुरनं. ६९८/२०२१, आर्म अॅक्ट कलम ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments