Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ "कलगी-तुरा' कार्यक्रम रद्द

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी-  तालुक्यातील चिचंपुर पागुंळ येथील गेली शंभर वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेला नागपंचमीच्या दिवशी गावामध्ये होणारा 'कलगी-तुरा' चा कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा  करोना रोगाच्या साथीमुळे  रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक व माजी सरपंच धनंजय बडे पा. यांनी दिली.
शंभर वर्षाहून अधिक काळापासून चालत आलेला हा कलगीतुरा कार्यक्रम प्रत्येक वर्षी अखंडपणे चालू होता. कलगी तुऱ्याची सुरवात डफ आणि तुंणतुण्याच्या वादनाने होते. त्यानंतर कलगीवाल्यात व तुर्यावाल्यात सवाल जवाब होत कार्यक्रम सादर करण्यात येतो.
त्यामध्ये शिव आधी कि शक्ती आधी ,झाड आधी कि फळ आधी,पाप-पुण्य परिपाक, गुरु- शिष्य संवाद,मायेचा बाजार,गुरुवदनं आणि शेवटी रामायण ,महाभारत यावर प्रश्न उत्तर करत कार्यक्रम सादर केला जातो.
हा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम पाहाण्यासाठी रसिक तसेच शाहीर , हे सांगली , सातारा, सोलापूर, बीड,औरंगाबाद, तसेच पुणे परिसर व नगर जिल्ह्यातील जामखेड,शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा भागातून  कलगी-तुराचे शौकिन येत असत.
पण यावर्षी जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेश असल्याने 'कलगी-तुरा'कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आज दि.१३ऑगस्ट २०२१(नागपंचमी)या दिवशी कोणीही कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहू नये,  असे आवाहन चिंचपुर पांगुळ  कलगीतुरा मंडळाने केले आहे.

संकलन-पत्रकार सोमराज बडे
मोबा-९३७२२९५७५७


Post a Comment

0 Comments