Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर अहवाल येताच, भिंगार कॅम्पचे पोउपनि देशमुख, सफौ शेख व चापो पालवे निलंबित


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगरभिंगार कॅम्प ठाणे हद्दीत आरोपी  मयत सादिक बिराजदार याच्याबाबत घडलेल्या घटनेत गुन्ह्यातील आरोपी सादिक याला पोलीस ठाण्यात  आणताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, सहायक फौजदार नैमुद्दीन शेख व पोलीस कर्मचारी पालवे यांना निलंबित  करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
आरोपी मयत सादिक लाडलेसाहब बिराजदार हा वाहनातून पडून जखमी  झाला आहे. असा प्राथमिक अहवाल शवविच्छेदनातून आला आहे,  असेही सांगण्यात आले आहे.
याप्रकरणाचा तपास नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या होता. श्री  ढुमे  यांनी सखोल चौकशी करून तो अहवाल वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना देण्यात आला आहे.
आरोपी सादिक विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलीस कर्मचारी शेख व पालवे त्याला ताब्यात घेऊन पोलीस  ठाण्यात घेऊन जात असताना भिंगारनाला  परिसरात सादिक याला पाच जणांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदार हिने दिली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपी सादिक याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.  या दोन्ही प्रकरणांची व घटनेची चौकशी  करण्याचे आदेश अधीक्षक श्री पाटील यांनी शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांना दिले होते. या चौकशीचा अहवाल श्री ढुमे यांनी पाटील यांच्याकडे सादर केला आहे. पोलिसांकडून आरोपी पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
👉मयत सादिक बिराजदार याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख  यांच्याकडे होता. तसेच बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी सहायक फौजदार शेख  व कर्मचारी पालवे हे गेले होते. यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून यामध्ये तिघे दोषी आढळले असल्याने त्यांचे निलंबन  करण्यात आले आहे.
सादिक याचे शवविच्छेदन पुणे येथे झाले. याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून डोक्याला व शरीराला जखम झाली असल्याचे  म्हटले आहे. परंतु पूर्ण माहिती अद्याप आलेली नाही. फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवालामध्ये  घटना ही अपघात असल्याचे दिसून येत आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments