Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर येथे 'काव्याज् हेल्थ ऑईल' चे दि.३० रोजी उद्घाटन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी- राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे भवानीनगर या ठिकाणी 'काव्याज् हेल्थ ऑईल' या लाकडी तेल घाण्याच्या प्रोजेक्टचे सोमवार (दि.३०) सकाळी ११.३० वा. उद्घाटन होणार असल्याची माहिती 'काव्याज् हेल्थ ऑईल' प्रोजेक्टच्या संचालिका सौ.कविता विनोद गायकवाड यांनी दिली.
या प्रोजेक्टचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गजें यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आयपीएस विक्रम बोके, राहाता साधन केंद्राच्या सौ. राजेश्री यशवंत डांगे, मंडल कृषी अधिकारी धनंजय वार्डेकर, आयसीआयसी बॅंक सेल्स मॅनेजर राजेंद्र खांडे, मुंबई बीएमसीसी सुप्रीटेन्डेन्ट अविनाश गायकवाड, डॉ. अंकुश शिल्लारे (नाशिक), डॉ. रजनिकांत गाडेकर,  उद्योजक सिद्धार्थ मोकळ, जयेशभाऊ कांबळे (सा.का.माही जळगाव), प्रविण दा. गायकवाड (सा.का.किवळे पुणे) आदि मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सौ. गायकवाड यांनी सांगितले.
सौ.गायकवाड म्हणाल्या की, काव्याज् हेल्थ ऑईल येथे लाकडी घाण्यातून तेल काढण्यात येणार आहे.  आपल्या आरोग्याची काळजी घेणारे लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल असणार आहे.Post a Comment

0 Comments