Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुकान फोडून चोरी करणारे आरोपी अटक ; भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- भिंगार परिसरातील दुकान फोडून चोरी करणा-या दोन चोरट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले. साहील राजु काकडे (वय 19  रा. सदरबाजार, भिंगार) तर दुसरा हा अल्पवयीन आहे.
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी  शिशिरकुमार देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पोहेकॉ ए एन नगरे, पोना  राहुल द्वारके,  पोना भानुदास खेडकर, पोकाँ अविनाश कराळे, चापोकाँ अरुण मोरे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 6 ऑगस्ट रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात गुर नं 309/2021 भादवि कलम 454,457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास चालू असताना कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली. 
त्यानुसार सापळा लावून  छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, नगर पाथर्डी रोड येथे दोघा चोरट्यांना पोलिसांनी पकडले. साहील काकडे याचे पॅन्टचे खिशात रोख रक्कम  2 हजार 350 रुपये मिळून आल्याने तर दोन पंचासमक्ष साहील राजु काकडे याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरात विवीध कंपनीच्या सिगारेट, पान मसाला, तंबाखू असा एकूण 19 हजार 266 रू चा मुद्देमाल व मिळून आल्याने ते गुन्हयाचे तपासकामी दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. दोघांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा पुढील  तपास पोना ए.व्ही पालवे हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments