Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वस्तात सोन्याचे अमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड ; नगर तालुका व एलसीबीची संयुक्त कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- स्वस्तात सोन्याचे अमिष दाखवून लुटणारी टोळी पकडण्यात नगर तालुका पोलिसांना व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. 
रामदास चंदर भोसले (वय 50), परमेश्वर पविकांत काळे (वय 20), शिवदास रामदास भोसले (वय 23), प्रतिक रामदास भोसले (वय 19 सर्व  रा.घोसपुरी ता. जि. अहमदनगर) व विधीसंघर्षित बालक अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
 जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक  सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण  उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके  यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुक्याचे सपोनि राजेंद्र सानप, सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश ईगळे, पोसई धनराज जारवाल, सफौ लबडे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, हिंगडे, खरेद पवार, गांगर्डे, धुमाळ, बड़े, पोना भानुदास सोनवणे, धर्मराज दहिफळे, राहुल शिंदे,रमेश शिंदे, पोकाॅ  घावटे, जाधव, भालसिंग मपोना गायत्री धनवडे, संगिता बढे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दि.२० जुलै २०२१ रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमधील सारोळा कासार या गावामध्ये स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून रा. बल्लारपुर (जि. चंद्रपुर) येथील एका इसमास अज्ञात दरोडेखोरांनी ७ लाख ५० हजार रोख रुपयांना गंडा घातला होता. त्याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात  गु.र.न. ४९४/२०२१ भा.द.वि.क. ३९५, ४२०,१२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल होता. या दाखला गुन्ह्याचा तपास चालू असताना गोपनिय व तांत्रिक माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे व  नगर तालुका पोलीस ठाणे अशी चार वेगवेगळी पथके तयार करुन नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमधून गुन्ह्यातील 4 आरोपी व विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित  साथीदारांचा नगर तालुका व स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे.

Post a Comment

0 Comments