Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यातील ११ अवैध धंद्यावर छापे ; एलसीबीची धडकेबाज कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द  दि.3 ते  दि.5 ऑगस्ट दरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ११ ठिकाणी छापे टाकून ३ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धडकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील  अपर पोलीस अधीक्षक  सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नगर एमआयडीसी, नगर तालुका, जामखेड, राहुरी, कर्जत, शिर्डी व कोपरगांव शहर पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अवैध धंद्याविरुध्द कारवाईची विशेष मोहीम दि.३ ते दि.५ ऑगस्ट च्या दरम्यान ११ ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यामध्ये  ३ लाख ८८ हजार ५०० रु. चा मुद्देमाल यात, गावठी हातभट्टीची तयार दारु, कच्चे रसायन, भट्टीची साधने जप्त करुन एकूण ११ आरोपी विरुध्द  गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.


Post a Comment

0 Comments