Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जमीन मोजणीच्या कारणावरून लोखंडी गज व दगडाने बेदम मारहाण

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -  मोजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी गजाने दगडाने बेदम मारहाण करून खुनाची धमकी दिल्याची घटना नगर पुणे रोड वरील केडगाव येथील कोतकर मळा येथे घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की अमोल मच्छिंद्र कोतकर( वय. 34 राहणार कोतकर मळा पेट्रोल पंपाजवळ केडगाव देवी )  यांची व त्यांच्या चुलत भाऊ अभिजीत अर्जुन खोतकर यांची जमीन शेजारी शेजारी असल्याने सदर जमीन आपापली योग्यरीत्या घेण्याकरिता जमिनीची मोजणी करून घेत असताना जमीन मोजणी त्यांच्यात वाद झाला त्यावेळी त्यांच्यात शिवीगाळ झाली. यावेळी अभिजित अर्जुन कोतकर व त्याचा मावस भाऊ संकेत निमसे राहणार कोतकर मळा केडगाव यांनी अमोल कोतकर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अभिजीत गाणे बाजूला पडलेल्या लोखंडी गजानन अमोल याच्या डोक्यात पाटील पोटावर पायावर मारहाण करून जखमी केले मग खाली पडून त्यास आम्ही दोघे जण आहोत. आमच्यातील एक गेला तरी चालेल पण तुम्ही काम करून खून करुन टाकू अशी धमकी दिली. व हातात दगड घेऊन दगडाने मारहाण करून त्यात गंभीर जखमी केले.याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून गंभीर मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.👉अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू एक जखमी 
 नगर पुणे रोडने भरधाव वेगात जाणाऱ्या मोटार सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेत मोटरसायकल चोराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आणि एक जखमी झाल्याची घटना केडगाव परिसरातील डॉक्टर जोशी हॉस्पिटल समोर जवळ हॉटेल समोर घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की विशाल कल्याण पिवळ (वय 24 आडुळ तालुका पैठण)  हा त्याच्या मोटरसायकलवरून संदीप ज्ञानेश्वर येवले (वय 22 ) याच्या सह नगर पुणे रोड केडगाव परिसरातून जात असताना विशाल पिवळ हा दारूच्या नशेत असल्याने त्याने अंदाधुंद गाडी चालवत रिक्षा किंवा एखाद्या चार चाकी वाहनास धडक दिली. या धडकेत विशाल पिवळ गंभीर जखमी झाला. तो त्याचा मित्र संदीप येवले हा जखमी झाला. दोघांना औषध उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले पिवळ याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.    
  याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपासाअंती हा अपघात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस हवालदार विश्वास गाजरे यांच्या फिर्यादीवरून या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक पंचमुख हे करीत आहे.👉स्टेशन रोड परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : गुन्हा दाखल
लुडो खेळण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच स्टेशन परिसरात घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की स्टेशन रोड परिसरातील एका फळं विक्री करणाऱ्या महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणाने सदर महिला तिच्या घरात झोपलेली असताना तिची लहान मुलगी घराबाहेर खेळत असताना तिला लूडो खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. आणि तिचे कपडे काढून तिच्या गुप्तांगाला हात लावला. त्या वेळी ती मुलगी मोठ्याने ओरडली.त्या आवाजाने तीची आई उठून तिकडे धावली आणि तिने मोठ्याने ओरडून मुलीस तेथून घेऊन आली. मुलीस काय झाले असे विचारताच तिने सर्व प्रकार सांगितला.तसेच या पूर्वीही त्याने असा प्रकार केल्याचे सांगितलें. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली असून अधिक तपास. कोतवाली पोलिस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments