Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आई, आजी,मामासह युवकावर गुन्हा दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव -  अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीनुसार मुलीची आई, आजी, मामासह बोधेगाव येथील युवकावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, वडिल यांनी आपली मुलगी हिचा विवाह बोधेगाव येथील युवकासोबत दि. १८ ऑगस्ट रोजी बोधेगाव येथील कुढेकर वस्तीवर होणार असल्याची माहिती मिळाली. दि.१७ ऑगस्ट रोजी चाईल्ड लाईन यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्याने बोधेगाव येथील पोलीस दुरक्षेत्र व  ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह होणार असलेल्या घटनास्थळी भेट देऊन खात्री केली. सदर घरे बंद आढळून आली तर याची कुणकुण लागताच संबंधितांनी दि.१६ ऑगस्ट रोजी हा बालविवाह गायकवाड (जळगाव ता.गेवराई जि. बीड) येथे अंध, अपंग शाळा येथे करण्यात आल्याची दि.२२ रोजी खाती झाल्याने अल्पवयीन मुलीचे वडील यांच्या फिर्यादीनुसार पत्नी,मेव्हणा, सासू  व नवरदेव  यांच्यावर आई, आजी, मेव्हणा व नवरदेव  अशा चौघांवर जाणीवपूर्वक बालविवाह करून दिल्याप्रकरणी पोलीसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये चौघांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास चकलांबा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
----------------
👉सदर फिर्यादी  व त्यांची पत्नी  यांच्या कुटुंबिक वाद झाल्यामुळे विभक्त असून पत्नी शिक्रापूर-पुणे येथे तीन मुली व एक मुलगा याच्यासोबत तर पती गावी  येथे आई वडिलांना सोबत राहत आहे.
सदर विवाहाची पत्रिका मुलगा यांचा साडु व मित्र  यांच्या मोबाइलवर या विवाहाची लग्नपत्रिका पाठविल्याने हा बालविवाह होणार असल्याची माहिती वडील  यांना माहीत होताच हा बालविवाह रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न वडिलांनी केला आहे. अखेर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संकलन : बाळासाहेब खेडकर, शेवगाव 

Post a Comment

0 Comments