Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीरामपूर येथे हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे : २ लाखांचा मुद्देमाल जप्त ; श्रीरामपूर डिवायएसपी पथकांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीरामपूर-  गोंधवणी परिसरातील पाच ठिकाणी  गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा पोलिसांनी छापेमारी  केली असून, या छाप्यामध्ये 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या  पथकांने ही कारवाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पीएसआय ऊजे, एएसआय राजेंद्र आरोळे, पोहेकाॅ सुरेश औटी, पोकॉ. नितीन शिरसाठ, श्याम बनकर, आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरी, गौतम दिवेकर आरसीपी पथक श्रीरामपूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
रविवार (दि.२९) रोजी श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकांने
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत असणारे सर्वच ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी उध्वस्त केल्या. अशोक काशिनाथ शिंदे याची हातभट्टी उध्वस्त केली, यात 42 हजार  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 2 हजार 500 रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू. अशोक सिताराम गायकवाड याची हातभट्टी उध्वस्त केली, यात 45 हजार 500  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन
3 हजार  रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू.   राजेंद्र फुलारे याची हातभट्टी उध्वस्त केली, यात 42 हजार   रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, 3 हजार  रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू,  दिलीप नाना फुलारे याची हातभट्टी उध्वस्त केली, यात 28 हजार   रु. कि.चे 400 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, २ हजार  रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी  दारू.   सुरेश फुलारे याची हातभट्टी उध्वस्त केली, यात 42 हजार   रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन,  3 हजार 500 रू  किमतीची 35  लिटर तयार गावठी हातभट्टी  दारू अशी पाच ठिकाणावरील गावठी हातभट्टी अड्डे ही भल्या पहाटे अचानक केलेल्या या कारवाईत श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मिटके यांच्या पथकांने उध्वस्त केली आहे. यामुळे  शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईत एकूण 2 लाख 1३ हजार 500 रुपये
  किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात  गु.र.नं. 568,569,570,571,572, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments