Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रावणी तिसऱ्या सोमवारी एकादश रुद्रांना सहजयोग परिवारा तर्फे दुग्धाभिषेक ; संपूर्ण जगातून कोरोना विषाणू समूळ नष्ट होण्यासाठी प्रार्थना

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-    श्रावणी तिसऱ्या सोमवारी अहमदनगर जिल्हा सहजोग परिवाराच्यावतीने संपूर्ण जगात वाढलेला कोरोनाविषाणू नष्ट होण्यासाठी दुग्ध अभिषेक करण्यात आले.आली संपूर्ण जग कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे असंतुलित झाले आहे.सदर प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक माध्यमातून प्रयत्न झालेत. परंतु त्यात यश आले नाही. प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवाराच्या वतीने ऑनलाईन ध्यान साधना दररोज सकाळी व संध्याकाळी विनामूल्य सुरु असून याचा लाभ अनेक देशातील  नागरिक घेत असून त्यांना त्याची प्रचिती ही आलेली आहे.
  याचाच भाग म्हणून अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने संपूर्ण जगातील एकमेव एकादश रुद्रांचे स्थान अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुसळवाडी या गावा मध्ये आहे.  हे स्वयंभू स्थान असून गावातील ग्रामस्थ याला म्हसोबाचे मंदिर म्हणून संबोधतात. 

याबाबत माताजींनी सांगितले की, हे म्हसोबा देवाचे तत्व एकादश असून याला एकादश रुद्रअसे संबोधावे सदरचे स्वयंभू मंदिर हे मुसळवाडी  तलावा शेजारील त्रिगुणात्मिक महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली शक्तीने बनले असून अत्यंत पवित्र स्थान आहे. श्री माताजींनी स्वयंभू एकादश हे महाराष्ट्राचे भूषण असून हा दैवी चमत्कार असल्याचे सांगितले आहे. हे स्थान सहस्त्रारा चे असून सर्व देवता येथे सूष्म स्वरूपात वास्तव्य असते.  एकादश म्हणजेच अकरा रुद्रांची शिवाची सरंक्षण व संघटक शक्ती होय. असे हे एकादश रुद्र जगातील एकमेव स्वयंभू असून या स्थळाजवळ  6 की. मी लांब अंतरावर प.पू. श्रीमाताजींनी सहजयोगातील पाहिले निर्मलधाम आश्रम आरडगाव या गावी स्थापित केलेले आहे.
 अश्या या स्वयंभू एकादश रुद्रांना अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने दुग्धाभिषेक घालण्यात आले. या वेळी एकादश रुद्राचे 11  नावांचे मंत्रोच्चार करण्यात येऊन  पूजा अर्चा केली व त्यानंतर ध्यानसाधना केली व एकादश रुद्रांकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव समूळ नष्ट होण्यासाठी व संतुलित पर्जन्यवृष्टी होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक सुधीरजी सरोदे,  गणेश भुजबळ, कुंडलिक ढाकणे,  अभय ठेंगणे , श्रीनिवास बोज्जा आदी उपास्थित होते.

Post a Comment

0 Comments