Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बेकायदेशीर दारु विक्री करणा-यांवर नगर तालुका पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- बेकायदेशीर दारु विक्री करणा-यां ठिकाणांवर छापे टाकून मुद्देमाल जप्त करुन संबंधित दारु विक्री करणा-यांवर  नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सुचनेनुसार पोहेकाॅ सरोदे, पोहेकॉ लगड आदिंसह पोलीस कर्मचा-यांनी कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.10 ऑगस्टला नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवार हाॅटेल पाटीलचे पाठीमागे संतोष बबन ठोंबरे हा विनापरवाना बेकायदा देशी विदेशी दारु बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्येशाने जवळ बाळगताना मिळुन आला.या पोकाँ ज्ञानेश्वर खिळे यांच्या फिर्यादीवरून तर चिचोंडी पाटील शिवार हाॅटेल साईगणेशच्या पाठीमागे बाळासाहेब मंजाबापू तनपुरे हा देशी विदेशी दारू बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आला, या पोकाँ विशाल टकले यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments