Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलेस हत्याराचा धाक दाखवून लुटणारा आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर- रस्त्याने पायी जाणा-या महिलेस हत्याराचा धाक दाखवून लुटणारा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.  किरण अरुण मेहेत्रे (वय २७ , रा. सदाफूले वस्ती, जामखेड, ता. जामखेड) असे पकडण्यात असलेल्याचे नावे आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार  सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, पोकॉ रणजित जाधव, जालिंदर माने, चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी, दि. ६ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी या गावातून जाधववाडी रस्त्याने एकट्याच पायी घरी जात होत्या. या दरम्यान  पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या अनोळखीनी चाकूचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफूले व दोन मोबाईल असा एकूण १९ हजार  रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेबाबत पारनेर पोलीस ठाणे येथे गुरनं. ५६९/२०२१ भादवि कलम ३९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.  या दाखल  गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस पथक करीत होते. श्री कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार  जामखेड येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेऊन शोध घेतला. आरोपी किरण अरुण मेहेत्रे याला ताब्यात घेतले. त्याचेकडे  गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. यावेळी पोलिसांनी खाक्या दाखविताच गुन्हा केला असल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ५ हजार रुपयांचा  विवो कंपनीचा मोबाईल काढून दिला. तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पारनेर पोलिस करीत आहेत.
आरोपी किरण अरुण मेहेत्रे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुध्द यापूर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, अपहार असे गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

0 Comments