Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सराईत गुन्हेगार आत्माशा भोसले याला अटक ; नगर तालुका पोलीसांची कामगिरी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- जिल्हयात दरोडा, जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार व  17 गुन्हे दाखल असणारा फरार आरोपी आत्माशा सावत्या भोसले याला मोठ्या शिताफीने पकडण्याची कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे.
 जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील,  अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे  सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार  पोहेकॉ ससाणे, पोहेकॉ प्रमिला गायकवाड, पोहेकॉ थोरात, पोना बी. व्ही. सोनवणे, पोना वाय. बी. ठाणगे, पोना धर्मराज दहिफळे, पोकॉ संदीप जाधव, निलेश खिळे, जय बांगर व चालक सफौ घोरपडे व चापोना पालवे 
आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
 नगर जिल्हयातील दरोडा, जबरी चोरी करणा-या आरोपींचा शोध घेण्याच्या पोलिस पथकाला सपोनि राजेंद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगर तालुका 
पोलीस पथकाने पिंपळगाव कौडा येथील डोंगराच्या पाठीमागून जाऊन कॉबिग ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनमध्ये अनेक गुन्हयात पाहिजे असलेला फरार आरोपी आत्माशा सावत्या भोसले याला मोठ्या  शिताफीने ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा अनेक वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होता व वारंवार गुन्हे करीत होता. नमुद आरोपी विरुध्द  गंभीर गुन्हे दाखल आहेत

Post a Comment

0 Comments