Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरीची दुचाकी वापरूनच चोरी करणारा आरोपी अटक ; भिंगार कॅम्पची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- चोरीची दुचाकी वापरून पान टपरी फोडणारा चोरटा भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडला आहे. लखन उत्तम वाघमारे (रा.दुधसागर सोसायटी केडगाव ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नावे आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी शिशिरकुमार देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली  पोहेकाँ रेवननाथ दहीफळे, पोहेकाँ जी. डी गोर्डे,  पोकाँ घोलप, पोना राहुल द्वारके पोना भानूदास खेडकर, पोना रघुनाथ कुलांगे, पोना अंबादास पालवे, चापोकाँ लगड, चापोकाँ संजय काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
 याबाबत समजलेले माहिती अशी, दि.11 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या  सुमारास नगर औरंगाबाद रोड रोडने भिंगार कॅम्प पोलीस रात्र गस्त चालू असताना ठाणे अंमलदार यांना फोन आला. अमीर मळा, नगर औरंगाबाद रोड येथे तीन चोर आले आहे. त्यामधील एका बोगस ताब्यात घेतले आहे, असा फोन आला. सदर ठिकाणी भिंगार कॅम्प पोलिसांनी जाऊन आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतला. त्याचेवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुर नं 319/2021 भादवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments