Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुटखा विक्री करणा-यावर छापा ; भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-  भिंगार येथे  विमल पान मसाला गुटखा विक्री ठिकाणावर छापा टाकून एकावर भिंगार कॅम्प पोलीसांनी कारवाई केली आहे.
नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सपोनि  शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोहेकाँ ए एन नगरे, पोना भानुदास खेडकर, पोना राहुल राजेंद्र द्वारके, पोना आर. एन. कुलांगे, समीर रमजान शेख आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 8.55 वा. सुमा. मतीन अस्लम शेख (वय 32, रा. घर नं 145, सदर बाजार, भिंगार ता.जि. अहमदनगर) हा 10 हजार 11 रू किं ची केसर युक्त विमल पान मसाला गुटखा लाल रंगाचे प्लॉस्टीक पाऊच मध्ये 53 पुडे प्रत्येकी पाऊच ची किं 187 रू. चा विमल पानमसाला गुटखा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा हे शरिरास अपायकारक आहे. हे माहीत असतानाही त्याची विक्री करण्याचे उद्देशाने प्रतिबंधीत पानमसाला गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगताना मिळून आला आहे. मतीन  शेख याचे विरूद्ध समीर रमजान शेख यांनी फिर्याद दिली आहे.  भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु र नं.350/2021 भादवि कलम 188,272,273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ व्ही.जी. धामणे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments