Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुचाकी चोरून विक्री करणारी टोळी कोतवाली पोलीसांनी केली जेरबंद

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- अहमदनगर शहरातील दुचाकी चोरून त्या विक्री करणारे चोरटे पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून २ लाख ६० हजार रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या  आहेत.
गणेश देविदास नल्ला (वय २३,  रा श्रमिक नगर पाईपलाईन रोड अहमदनगर),  हनुमत राजेंद्र गायकवाड (वय २०, रा मुंगुसबाड़ी खरखंडी ता पाथड़ी जि अ नगर),  दिपक बाळू कांबळे (वय २६, रा मोकाशे वस्ती कादंबरी नगरी पाईपलाईन रोड अ नगर),  शिवाजी सोन्याबापू साबळे (वय ३१, रा तपोवन रोड शिवाजी नगर अ नगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक  सारभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि राकेश मानगांकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोना बंडु भागवत, पोना शाहीद शेख, पोना सुमित गवळी, पोना अभय कदम, पोको दिपक रोहकले, पोना आनंद दाणी, पोना योगेश भिंगारदिवे, पोना नितीन शिंदे, पोना सागर पालवे, पोना नितीन गाडगे, पोना भारत इंगळे, पोकॉ सुशील वाघेला. पोकॉ सुजय हिवाळे, पोकों तान्हाजी पवार, पोकों कैलास शिरसाठ, पोको प्रमोद लहारे, पोका सोमनाथ राऊत आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments