Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोक्का गुन्हयातील फरार आरोपी अटक ; एलसीबीची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- मोक्का गुन्हयातील फरार आरोपी बाळासाहेब उर्फ बाळा रमेश भिंगारदिवे (रा. आगडगाव, ता. जि. अहमदनगर) याला शिराळा (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील दुर्गा देवी मंदिराजवळ  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पोउपनि इंगळे साहेब, सफी मनोहर शेजवळ, पोहेकॉ भाऊसाहेब कुरुंद, पोहेकॉ संदिप घोडके, पोना सुरेश माळी, पोना संतोष लोंढे, पोको जालिंदर माने, चापोना चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत.
 त्यांचे विरुद्ध मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. या अनुशंगाने कॅम्प पांलीस स्टेशन पोलीस स्टेशन गु.र.नं. २८२७ / २०२० मा. पं. वि.क. ३९५,३९७, ३२४,३२३,५०४, ५०६.१२० (ब) सह शस्त्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दि.२० नोव्हेंबर २०२० रोजी २१.३० वाजण्याच्या सुमारास छावणी परिषद अहमदनगर सोलापूर रोड, अहमदनगर येथे घडला होता. सदरच्या गुन्ह्यातील आरोपी  प्रकाश दशरथ भिंगारदिवे (वय ३०, टोळीप्रमुख रा.निंबोडी वेशीजवळ, ता. जि. अहमदनगर),  संदीप ऊर्फ म्हम्या शरद शिंदे ( वय २५ रा. भोसले आखाडा, बुरुडगाव रोड, भागवत चाळसमोर अहमदनगर),  विक्रम आनंदा गायकवाड (फरार रा. वाळुंज ता. जि. अहमदनगर),   बाबा ऊर्फ भाऊसाहेब सोपान आढाव (रा. वाळुंज ता. जि. अहमदनगर),  संदीप परशुराम वाघचौरे (वय ३० रा.दरेवाडी ता. जि. अहमदनगर),  अर्जुन सबाजी दुबे  ( रा. खन्ना धाय्याशेजारी दरेवाडी ता. जि. अहमदनगर ), बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे ( रा. आगडगाव ता. जि. अहमदनगर), लॉरेंन्स दोराई स्वामी (रा. बंगला नं. १, सैनिक नगर, प्रियदर्शनि शाळेजवळ नगर पाथडी रोड ता. जिल्हा अहमदनगर) यांनी संघटित टोळी करुन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाली. त्यांची एक टोळी असून ते आर्थिक फायदयासाठी गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हयास  विशेष पोलीस महानिरीक्षक  नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे परवानगीने गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम मोक्का अंतर्गत १९९९ चे कलम ३ (१)(ii), ३(२) व ३ (४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले. गुन्हा केल्या पासून गुन्हयातील आरोपी बाळासाहेब उर्फ बाळा रमेश भिंगारदिवे ( रा. आगडगाव, ता. जि. अहमदनगर) हा फरार झालेला होता.Post a Comment

0 Comments