Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीत ५७ लाख गांजा जप्त ; दोन महिल ताब्यात, उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी- तालुक्यातील शंकरवाडी येथे ७२१.१४२ किलो ग्रॅम वजनाचा अंदाजे ५७ लाख ६९ हजार १३६ रुपयेचा गांज्याचा अंमली पदार्थाचा बाहेरुन आलेला साठा पोलीसांनी जप्त करुन दोन महिलांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन मुढे यांच्या सूचनेनुसार  शेवगाव विभाग पो.  संजय बडे, चापोहेकॉ अकोलकर, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पो.नि सुहास बी. चव्हाण, सपोनि आर.डी कायंदे, पोना  ए.बी बड़े, पोकॉ देविदास तांदळे,  पोकॉ  भगवान सानप, पोकॉ प्रतिभा नागरे,  चा.पणे जे कॉ सुद्रुक, पोकॉ ई.एस बुधवंत, सोनई पोलीस स्टेशनचे स.पो.नि थोरात सो., पोकॉ ठोंबरे, पोकॉ वाघमोडे, पोना मुळे, पोकॉ थोरात तसेच शनीशिंगणापुर पोलीस स्टेशनचे सपोनि बागुल, मपोकॉ नवगिरे, मपोकॉ राठोड, मपोकाँ काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पुढिल तपास पो.नि सुहास बी चव्हाण हे करीता आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, शेवगाव विभाग यांना मिळालेल्या गुप्तबातमी दारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली,  शंकरवाडी गावचे शिवारात बापू आवाड, साहेबराव आवाड, गोरख आवाड, विलास आवाड हे व त्याचे घरातील इतर सदस्य यांनी त्यांच्या घरात व ऊसाचे शेतात मोठ्या प्रमाणात गांज्या लपवून ठेवला आहे,  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, शेवगाव उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन मुंडे यांनी त्यांचे पथक तयार केले. पोलिस पथकाने त्या ठिकाणी जावून कारवाई केली.  त्या ठिकाणी दोन महिला मिळून आल्या,  त्यांचे ताब्यात ७२१.१४२ किलो ग्रॅम वजनाचा अंदाजे ५७ लाख ६९ हजार ९३६ रुपयांचा गांज्याचा अंमली पदार्थाचा बाहेरुन आलेला साठा मिळून आला.  तसेच सदर महिलेकड विचारपुस करता सदरचा गांज्याचा साठा हा  नारायण भालके (पुर्ण नाव माहिती नाही), बाळासाहेब उर्फ बबन दहातोंडे (पुर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. चांदा ता. नेवासा जि. अहमदनगर) यांचा असून तो आमचे शेतात ठेवून बापु आवाड,  साहेबराव आवाड, गोरख आवाड, विलास आवाड (सर्व रा. शंकरवाडी ता. पाथडी) यांना राखण करण्यास दिला होता. अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिस उर्वरित फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments