Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगावाला कुंटणखानावर विशेष पोलिस पथकाचा छापा ; परप्रांतीय महिलांची सुटका

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव -  शेवगाव-नेवासा तोडलसगत सागर लॉजवर रात्री कुंटणखानावर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने छापा टाकून तीन पुरुष व दोन परप्रांतीय महिलांना पकडण्यात आले.

याबाबत समजलेली माहिती अशी की,  शेवगाव ते नेवासा जाणारे रोडवरील सागर लॉजमध्ये  सुरू असलेल्या कुंटणखानामध्ये जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने शनिवारी (दि.२१) रात्री छापा टाकून तीन पुरुष व दोन परप्रांतीय महिलांना रंगेहात पकडले.  अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधि नियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे शेवगाव पोलिस ठाण्यात सामाजिक सेवक संदेश किसन जोगेराव  व्यवसाय  (रा. साळुंके विहार पुणे ता. जि. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार सचिन रूपचंद मुसावत (रा. शेवगाव ता. शेवगाव),  संदीप माणिक शेळके (रा. रामनगर नेवासा रोड ता. शेवगाव),  अमर अश्पाक शेख (रा,पिंगेवाडी तालुका शेवगाव ) व  महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
    यातील आरोपी हे स्वतःचे फायदा करिता कुंटणखाना चालवून आपसात संगनमत करून त्यावर मिळणाऱ्या पैशावर आपली उपजीविका भागवून पीडित मुलींना अवैध वेश्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना कुंटणखाण्यामध्ये अडकवून वेश्या गमना करिता प्रवृत्त करून त्यांना गिऱ्हाईकांना दाखवून अवैधरित्या कुंटणखाना चालविताना मिळून आलेवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.न. व कलम -५१०/२०२१ भा.द.वि.कलम ३७०(३) सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधि नियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे रविवार (दि २२) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आले. घटनास्थळी पो. नि. प्रभाकर पाटील यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि ठाकरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments