Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद ; एलसीबीचीकारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नगर रिपोर्टर
अहमदनगर- रात्रीचे वेळी घराचे दरवाजे उघडून मारहाण करीत लुटमार करणारे सराईत गुन्हेगारांना  पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
अनिकेत उर्फ घान्या उर्फ शिवम वैभव काळे (वय २०), सेशन उर्फ रोशन उर्फ सेशा रायभान भोसले, (वय ३०, दोघे रा. साकेगाव, ता. पाथर्डी) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना दिपक शिंदे, शंकर चौधरी, पोकाॅ  सागर ससाणे, रणजित जाधव, सागर सुलाने, रोहीत येमूल, चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी, दि ८ऑगस्ट  रोजीचे रात्री कुटूंबासह घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांचे घराचा दरवाजा वाजविला. त्यावेळी फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला असता आरोपींनी घरामध्ये प्रवेश करुन आईस लोखंडी गजाने मारहाण करुन सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ३९ हजार  रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेबाबत दिलीप संभाजी पवार (रा. भगूर, ता. शेवगाव ) यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुरनं. ४७८/२०२१ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा गुन्हा  गुन्हा हा घान्या उर्फ शिवम काळे, रा. साकेगाव, ता. पाथर्डी याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती पो.नि.श्री कटके यांना मिळाल्याने त्यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने  पाथर्डी येथे जाऊन  आरोपीचे ठाविठकाणाबाबत गोपनिय माहीती घेतली. आरोपींचा शोध घेऊन आरोपी अनिकेत उर्फ घान्या उर्फ शिवम वैभव काळे याचा साकेगाव परिसरातून पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वसात घेऊन कसून चौकशी केली,  त्याने  गुन्हा हा त्याने व त्याचे इतर चार साथीदारांनी मिळून केला असल्याचे सांगितले.  माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेवून आरोपी  सेशन याला पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित तीन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
पकडण्यात आलेल्या दोन आरोपीकडून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ७ हजार  रु. किं. चा विवो कं. चा मोबाईल जप्त केला. आरोपींना मुद्देमालासह शेवगाव पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलेल. पुढील कार्यवाही शेवगाव पोलिस करीत आहेत. आरोपी अनिकेत उर्फ धान्य उर्फ शिवम वैभव काळे याचे विरुध्द यापूर्वी पैठण पोलिस ठाणे (औरंगाबाद),  रहिमतपूर पोलिस ठाणे (सातारा) गुन्हे दाखल आहेत.


Post a Comment

0 Comments